पू. भगवंत मेनरायकाका (वय ८५ वर्षे) यांच्या सेवेसाठी गेल्यावर लक्षात आलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
१. जाणवलेली सूत्रे
अ. ‘१६.५.२०२४ या दिवशी पू. भगवंत मेनरायकाका (सनातनचे ४६ वे समष्टी संत) यांना मी नमस्कार केल्यावर त्यांनी माझ्याकडे डोळे उघडून पाहिले. तेव्हा ‘ते निर्गुणात पहात आहेत’, असे मला जाणवले. पू. काका मला लहान बालकाप्रमाणे वाटत होते.
आ. ४.६.२०२४ या दिवशी सायंकाळी ७.३५ वाजता माझा मुलगा (श्री. हर्षद खानविलकर) याने सांगितले, ‘‘पू. भगवंत मेनरायकाकांनी देहत्याग केला.’’ तेव्हा मी त्यांना मानस नमस्कार केला. मी पंचांग पाहिल्यावर लक्षात आले की, त्या दिवशी तिथी वैशाख कृष्ण त्रयोदशी, शिवरात्र असे लिहिले होते. तेव्हा मला असे जाणवले की, पू. काकासुद्धा शिवभक्त होते आणि भगवान शिवाने त्यांना जवळ घेतले. मला वाटले, ‘शिवभक्त पू. काकासुद्धा श्रीविष्णूच्या म्हणजे श्री गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) हृदयात विलीन झाले.’ पू. काकांचे अंत्यदर्शन घेत असतांना ‘ते पुष्कळ दिवसांनी शांत निद्रा घेत आहेत’, असे जाणवले.
२. अनुभूती
१६.५.२०२४ या दिवशीपासून मी पू. भगवंत मेनरायकाका यांच्या सेवेसाठी जात होतो. त्यांच्या खोलीत गेल्यावर सकाळी ११ वाजताही पुष्कळ गारवा जाणवत असे. ’
– श्री. उदय खानविलकर (वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.५.२०२४)
|