‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्या ८० व्या वर्षी भक्तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद्गार आणि त्याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !’, या लेखाच्या संदर्भात मिळालेले सूक्ष्म स्तरीय ज्ञान आणि आलेली अनुभूती

‘३.७.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्‍या ८० व्‍या वर्षी भक्तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद्गार आणि त्‍याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !’, हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाच्या संदर्भात मला मिळालेले सूक्ष्म स्तरीय ज्ञान आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची साधना गुरुकृपायोगातून झाली असून तेच ‘प्रथम गुरुकृपायोगी’ असणे 

पू. संदीप आळशी

१ अ. विशिष्ट शिष्याला विशिष्ट गुरु लाभण्यामागील शास्त्र ! : काही व्यष्टी उपासक त्यांच्या प्रकृतीनुसार साधना करायला प्राधान्य देतात. त्यांना अन्य साधनामार्ग सांगितले, तर त्यातून त्यांचे प्रयत्न होत नाहीत किंवा कधी-कधी त्यांची साधना बंद पडते. यामुळे ईश्वरही त्यांची त्यांच्या प्रकृतीनुसार साधना सांगणार्‍या गुरूंशी भेट घालून देतो. याउलट ज्या शिष्यांमध्ये आध्यात्मिक उन्नतीची खरी तळमळ असते, ईश्वर त्यांची त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी पूरक अशा गुरूंशी भेट घालून देतो. आध्यात्मिक उन्नतीची खरी तळमळ असलेल्या शिष्यांच्या प्रगतीसाठी जे मार्ग पूरक असतात, तेच मार्ग गुरु त्यांना सांगतात किंवा अंतरातून त्यांना त्या साधनामार्गाचे बोध होतो. याचे प्रत्यक्ष उदाहरण, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

१ आ. गुरूंच्या आज्ञेने ‘ज्ञानयोग आणि कर्मयोग’ यांच्या माध्यमातून साधना करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे गुरुकृपायोगी असणे : गुरूंच्या मार्गदर्शनानुसार ‘ज्ञानयोग आणि कर्मयोग’ या मार्गांनुसार साधना करून प्रगती होण्यास २० ते २५ वर्षे लागतात. याउलट सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना वर्ष १९८७ ते वर्ष १९९५, म्हणजे केवळ ८ ते ९ वर्षेच गुरूंचा सहवास लाभला. असे असूनही या ८ ते ९ वर्षांच्या कालावधीत त्यांच्या आध्यात्मिक पातळीत २० टक्के वाढ झाली.

१ आ १. गुरूंच्या सहवासात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची झालेली आध्यात्मिक उन्नती 

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वत:च्या साधनेसंदर्भात काढलेली आध्यात्मिक पातळी.

(संदर्भ ग्रंथ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार)

१ इ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले गुरुकृपायोगी आहेत’, हे सिद्ध करणारी काही तत्त्वे 

श्री. निषाद देशमुख

१. केवळ ‘गुरुकृपायोग’ या मार्गाने साधना केल्यास ‘सूत्र १ आ १’ यामध्ये दिल्यानुसार एवढ्या अल्प कालावधीत एवढ्या जलद गतीने आध्यात्मिक उन्नती करता येते.

२. केवळ ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गात ‘ज्ञान, भक्ती आणि कर्म’ यांचा समतोल आहे, म्हणजे तिन्ही मार्गांची साधना गुरुकृपायोगातून होते.

३. गुरुकृपायोगानुसार साधनामार्गात ‘शिष्याने कधी कोणत्या मार्गाने साधना करावी ?’, हे गुरु ठरवतात. गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्राधान्याने ‘ज्ञान आणि कर्म’ या मार्गांनुसार साधना केली, तर आता ते भक्तीयोगातील साधना समष्टीला शिकवत आहेत.

या सूत्रांतून लक्षात येते, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा साधनामार्ग ‘गुरुकृपायोग’ आहे.’

१ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हेच ‘प्रथम गुरुकृपायोगी’ असणे : परात्पर गुरु पांडे महाराज यांनी विठ्ठलाला ‘पहिला वारकरी’, असे संबोधले आहे. याचे कारण स्वत: देव असूनही विठ्ठलाने भक्तांसाठी वैकुंठातून पृथ्वीपर्यंतची यात्रा केली आहे. याच प्रकारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे गुरुकृपायोगाचे जनक तर आहेतच आणि त्यांनी ‘मुमुक्षू, जिज्ञासू, साधक, शिष्य, संत, सद्गुरु, राष्ट्रगुरु, धर्मगुरु, परात्पर गुरु, मोक्षगुरु’ अशा साधनेतील सर्व टप्प्यांशी निगडित मार्गदर्शन स्वत:च्या योग्य आचरणाद्वारे समष्टीला केले आहे. यामुळे ते प्रत्यक्ष अवतार असले, तरी भगवान विठ्ठलाप्रमाणे ते ‘प्रथम गुरुकृपायोगी’ही आहेत.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन व्यष्टी आणि समष्टी साधनेला उपयुक्त असणे

व्यष्टी स्तरावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्याशी एकरूप होत आहेत. त्यामुळे त्यांना भक्तीचे रहस्य उमगत आहे. समष्टी स्तरावर भक्तीयोगप्रधान साधनेची आवश्यकता आहे. त्यामुळे ‘काळानुसार आता समष्टी साधनेच्या अंतर्गत भक्तीला महत्त्व देणे आवश्यक आहे’, हेच ‘प्रथम गुरुकृपायोगी’ असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले भक्तीयोगानुसार साधना करत आहेत’, असे समष्टीला सांगून समाजाला भक्तीसाधना करण्याकडे नेत आहेत.

३. ‘साधकांनी ‘ज्ञान, भक्ती आणि कर्म’ या तिन्ही स्तरांवर साधनेचे प्रयत्न वाढवणे’, हीच त्यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता ठरेल ! 

‘गुरुकृपायोग’ हा एकमेव असा योगमार्ग आहे, जो समष्टी साधना शिकवतो. व्यष्टी साधना कोणत्याही योगमार्गाने करू शकतो; पण समष्टी साधनेत ‘ज्ञान, भक्ती आणि कर्म’ या तिन्ही योगमार्गांचा समतोल गाठणे आवश्यक असते. ‘गुरुकृपायोगात कधी कोणत्या मार्गाने साधना करणे आवश्यक आहे ?’, हे त्या-त्या वेळी समष्टी गुरु समष्टीला सांगत असतात. याचे उदाहरण म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लिहिलेला हा लेख. ‘साधकांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे, म्हणजेच ‘ज्ञान, भक्ती आणि कर्म’ या तिन्ही स्तरांवर साधनेचे प्रयत्न वाढवणे’, हीच त्यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी खरी कृतज्ञता ठरणार आहे.

४. अनुभूती 

गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यावर स्वप्नातील ‘प्रथम गुरुकृपायोगी’ शब्दाचे पुनःपुन्हा स्मरण होणे : ३.७.२०२३ या दिवशी (गुरुपौर्णिमेच्या दिवशी) सकाळी उठल्यावर माझ्या मनात ‘प्रथम गुरुकृपायोगी’ हेच शब्द पुनःपुन्हा येत होते. ‘हे शब्द मी स्वप्नात ऐकले आहेत’, असे मला आठवत होते; पण मला स्वप्नातील अन्य काहीच भाग आठवत नव्हता. ‘त्या शब्दाचा अर्थ काय ? ते शब्द स्वप्नात दिसण्याचे कारण काय ?’, असे काहीच त्या वेळी मला कळले नाही.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे उद्गार’, हा लेख वाचतांना ईश्वरी ज्ञान मिळाल्यावर मला त्या मागील कारण कळले. ‘कदाचित् स्वप्नातच मला हे ज्ञान मिळाले आणि लेख वाचतांना मला त्याचे स्मरण झाले’, असे मला वाटले. या अनुभूतीसाठी श्री गुरुचरणी कृतज्ञता !’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक