नवी मुंबई महापालिकेने शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली !
नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ‘शिष्यवृत्ती योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे, अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी दिली. अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.schemenmmc.com या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येत आहेत. अद्याप पर्यंत ३१ सहस्रांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.