काँग्रेस समाजातील एकजूट तोडण्याचा प्रयत्न करत आहे ! – पंतप्रधान
पुणे – काश्मीरमध्ये राज्यघटनेचे रहित केलेले कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी काश्मीर विधानसभेत संमत केला आहे. ‘काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करा’, ही कुणाची मागणी आहे ? ही भाषा केवळ पाकिस्तानची होती. आज तीच भाषा काँग्रेस करत आहे. काँग्रेसची मानसिकता गुलामगिरीची आहे. त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा अवमान केला आहे. समाजातील एकजूट तोडण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये महायुतीच्या विधानसभेतील उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. त्या सभेमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. ही सभा स.प. महाविद्यालयातील प्रांगणामध्ये १२ नोव्हेंबर या दिवशी पार पडली.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,
१. मी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात फिरत आहे. अशीच गर्दी, असाच उत्साह, हीच उमंग मला जाणवते. परत महायुतीचे सरकार येणार.
२. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करून दाखवावी.
काँग्रेस दलित, आदिवासी आणि अनुसूचित जाती-जमाती अन् ओबीसी यांमध्ये भांडणे लावून त्यांना वेगळे करण्याच्या विचारात आहे. त्यावर ‘आम्ही सर्व एक राहू, तर सुरक्षित राहू’, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी दिली.