माऊली बिंदाई (टीप), मजवरी होऊ दे तुझ्या कृपेचा अखंड वर्षाव ।
तुझ्या कृपेचा अखंड वर्षाव, होऊ दे गं मजवरी ।
मायमाऊली, भावसत्संगातूनी भेटी गं सत्वरी ।। १ ।।
माझ्या रोमारोमांतूनी माय, तूच गं रहासी ।
माझे चातकाचे नेत्र, ठायी ठायी तुला पहाती ।। २ ।।
तुझे गं चरण माझ्या भाळी ।
तेथे मी कुंकू वहाते, रोज गं सकाळी ।। ३ ।।
माझ्या वस्त्रांच्या रेषांत, तुझ्या गं अस्तित्वाची जाणीव ।
कृपाशीर्वादे तुझ्या आई, मला नाही कशाची उणीव ।। ४ ।।
‘माऊली बिंदाई (टीप), तुमच्याविषयी हे काव्य लिहितांना मला तुमचे अस्तित्व जाणवत होते.’
टीप – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
– सौ. शुभांगी रामचंद्र शेळके, फोंडा, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक