TISS On Mumbai Hindu Population : मुंबईत वर्ष २०५१ पर्यंत हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाणार !
|
मुंबई – बांगलादेश आणि म्यानमार येथून बांगलादेशी अन् रोहिंग्या मुसलमानांची बेकायदेशीर घुसखोरी होत आहे. यामुळे वर्ष २०५१ पर्यंत येथील हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांच्याही खाली जाईल, तर मुसलमानांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक होईल, असे ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ने त्याच्या अहवालातून उघड केले आहे. ‘मुंबईतील बेकायदेशीर स्थलांतरित : सामाजिक-आर्थिक आणि राजकीय परिणामांचे विश्लेषण’ या शीर्षकाचा ११८ पानांचा अंतरिम अहवाल संस्थेने प्रसिद्ध केला आहे.
Mumbai’s Hindu population to drop below 54% by 2051! 🚨
Report by Tata Institute of Social Sciences (TISS), the city’s demographic landscape is shifting dramatically.
Report highlights concerns about uncontrolled infiltration & demographic shift
Key Statistics:
– 1961: Hindus… pic.twitter.com/gdXa9d5Nit
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 13, 2024
या अहवालात म्हटले आहे की…,
१. काही राजकीय संघटना बेकायदेशीर स्थलांतरितांचा वापर त्यांच्या मतपेटीच्या राजकारणासाठी करत आहेत. बेकायदेशीर स्थलांतरितांना मुंबईत मतदार ओळखपत्र सहज मिळत असून ते मतदान करत आहेत.
२. मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या वर्ष १९६१ मध्ये ८८ टक्के होती. वर्ष २०११ मध्ये ती ६६ टक्के झाली; मात्र मुसलमानांची लोकसंख्या ८ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर गेली.
बेकायदेशीररित्या स्थलांतरितांमुळे निर्माण झालेले धोके !
१. मुंबईतील १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुसंख्य लोकसंख्या ही स्थलांतरितांची आहे. यामुळे मतदानाच्या पद्धतींवर परिणाम होतो.
२. अहवालाच्या अभ्यासासाठी समाविष्ट असलेल्या ५० टक्क्यांहून अधिक महिलांची तस्करी करण्यात आली होती आणि त्या वेश्याव्यवसायात गुंतलेल्या होत्या. यांपैकी ४० टक्के महिला बांगलादेशातील त्यांच्या घरी प्रत्येक महिन्याला पैसे पाठवत असून ती रक्कम १० सहस्र ते १ लाख भारतीय रुपये आहे.
Mumbai मध्ये Hindu अल्पसंख्याक होणार? | Reports | About TISS | Chandrashekhar Nene Maha MTB (सौजन्य : MahaMTB) |
३. अवैध स्थलांतरितांमुळे झोपडपट्ट्यांमध्य गर्दी होत आहे.
४. घुसखोरांमुळे गोवंडी, कुर्ला आणि मानखुर्द यांसारख्या झोपडपट्टी भागांवर वीज अन् पाणी यांच्या पुरवठ्याचे संकट ओढावले आहे. आरोग्यसेवा, शिक्षण आणि स्वच्छता यांसारख्या सार्वजनिक सेवांवरही परिणाम होत आहे.
५. स्थानिकांसाठी नोकर्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे.
६. ‘सारांश, निष्कर्ष आणि परिणाम’ या शीर्षकाच्या अहवालातील एका भागात असे म्हटले आहे की, बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी न्यून करण्यासाठी प्रभावी धोरणात्मक हस्तक्षेपाची कार्यवाही करणे आवश्यक आहे.
संपादकीय भूमिका
|
मुंबईतून बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना हद्दपार करणार ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहाबोरिवली – मुंबईकरांनो, आमच्या सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या आधी मुंबईतून एकेक बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना शोधून बाहेर काढण्याचे काम भाजप करणार आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी येथे झालेल्या सभेत केली. या सभेला केंद्रीय मंत्री पीयूष गोयलसुद्धा उपस्थित होते.
संपादकीय भूमिकामुंबईतून नव्हे, तर संपूर्ण देशातून बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया या आकडेवारीवरून तात्काळ युद्धपातळीवर करण्याची आवश्यकता आहे, असेच लक्षात येते ! |