पुणे येथील हिंजवडीतील ‘आयटी पार्क’ला जलप्रदूषणासाठी नोटीस !
पुणे – हिंजवडीतील ‘राजीव गांधी इन्फोटेक (आयटी) पार्क’कडून जलप्रदूषण होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आयटी पार्कमधील सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील सांडपाणी मुळा नदीमध्ये थेट सोडण्यात येत असल्याचा ठपका ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने ठेवला आहे. या प्रकरणी नोटीसही देण्यात आली असल्याचे समजते. प्रदूषित पाण्यामुळे मुळा नदीतील माशांचा मृत्यू झाला होता. तेव्हा पाण्याची पडताळणी २४ सप्टेंबरला करण्यात आली होती. या पडताळणीमध्ये अनेक गंभीर त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. (निष्क्रीय प्रशासन ! जीवघेण्या समस्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे सामान्य जनतेला वाटते ! – संपादक)