शिल्पकार जयदीप आपटे जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात !
मालवण येथील शिवपुतळ्याच्या दुर्घटनेचे प्रकरण
मुंबई – मालवण येथील शिवपुतळ्याच्या दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोसाट्याच्या वार्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा कांस्य पुतळा कोसळल्याचा दावा आपटे याने केला आहे. ‘मी यापूर्वी नौदलासाठी कांस्य पुतळ्यांचे काम केले आहे; परंतु नौदलाने माझ्या कामाविषयी कधीच तक्रार केलेली नाही; याउलट धातू शास्त्रातील तांत्रिक कौशल्याविषयी काहीच ठाऊक नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दुर्घटनेच्या ९ घंट्यांच्या आत या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली. पुतळा कोसळल्यामुळे कुणीही घायाळ झाल्याचे तक्रारीत नमूद नाही. त्यामुळे हे प्रकरण निष्काळजीपणाचे असू शकते’, असा दावाही आपटे याने याचिकेत केला आहे.