सेवा आणि साधना यांच्याप्रती ओढ असणारा कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. देबप्रसाद प्रमाणिक (वय ११ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. देबप्रसाद प्रमाणिक हा या पिढीतील एक आहे !
(कु. देबप्रसाद प्रमाणिक हा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला आहे. वर्ष २०२० मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले होते. – संकलक)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. कु. देबप्रसाद प्रमाणिक याच्या आध्यात्मिक त्रासांत झालेले पालट : ‘पूर्वी सकाळ-संध्याकाळ किंवा दिवसा कधीही त्याला लागोपाठ ८ ते १० शिंका येत असत. त्याला सर्दी-खोकला सतत असायचा. त्यासाठी उन्हाचे उपाय केले, तसेच नामजप करण्यासाठीचे प्रयत्न वाढवले. आता हा त्रास अल्प झाला आहे.
२. साहाय्य करण्याची वृत्ती : ‘देबप्रसाद आई-वडिलांना घरातील सेवा करण्यात साहाय्य करतो, तसेच ते बाहेर जातांना घड्याळ, उपनेत्र, भ्रमणभाष, किल्ली इत्यादी सर्व आणून देतो. तो इतरांनाही साहाय्य करतो.
३. तत्त्वनिष्ठता
अ. तो त्याच्या मोठ्या भावाला चुकीचे वागण्यापासून परावृत्त करतो. भावाने त्याला उशिरापर्यंत खेळायला सांगितले, तर देबप्रसाद भावाला म्हणतो, ‘आता वेळ झाली आहे. घरी जायला हवे.’
आ. वर्गात त्याला वर्गप्रमुख (मॉनिटर) नेमले आहे. वर्गमित्रांनी (सहपाठींनी) काही अयोग्य कृती केल्यास, उदा. बाकावर (‘बेंच’वर) चालणे, भिंतींवर लिहिणे, वह्यांची पाने फाडणे इत्यादी करण्यापासून तो त्यांना परावृत्त करतो.
४. राष्ट्राभिमान : २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट नंतर मार्गांवर पडलेले राष्ट्रध्वज पाहून त्याला पुष्कळ वाईट वाटते आणि तो ते लगेच उचलून योग्य ठिकाणी ठेवतो.
५. सेवेची ओढ
अ. देबप्रसादची सेवा करण्याची ओढ वाढली आहे.
आ. त्याला सेवा मिळाल्यावर त्याचा उत्साह वाढतो.
इ. मी गुरुपौर्णिमेच्या ग्रंथप्रदर्शन सेवेसाठी जातांना तो माझ्या समवेत येतो.
ई. त्याला कोणतीही सेवा मिळाल्यास तो ती सेवा पुष्कळ आवडीने करतो.
उ. त्याला साधकांसमवेत रहायला आवडते.
६. साधनेप्रती ओढ
अ. तो प्रतिदिन नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे आणि अत्तर-कापराचे उपाय करतो.
आ. तो स्वतःच्या चुकांचे निरीक्षण करून त्या मला सांगतो..
इ. त्याने स्वतःची चिंतनसारणी बनवली आहे. तो जितके प्रयत्न करतो ते प्रतिदिन चिंतनसारणीत भरतो.
ई. चूक झाल्यावर गुरुदेव आणि आई-वडील यांची क्षमायाचना करतो.
उ. तो सामूहिक नामजप, ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी छायाचित्रे काढण्याची सेवा करतो.
ऊ. त्याला बालसंस्कारवर्गात नियमित जाण्याची ओढ असते.
ए. बालसंस्कारवर्गात सांगितल्याप्रमाणे तो संपूर्ण आठवडा कृती करण्याचा प्रयत्न करतो.
ऐ. त्याला भीती वाटते आणि वाईट स्वप्ने पडतात, त्या वेळी तो मला नामपट्ट्यांचे मंडल घालायला सांगतो.
७. गुरुदेवांप्रती अपार भाव असणे
अ. घरासमोर अंगणात काही फुलझाडे लावली आहेत. त्यांवर काही फुले उमलल्यास तो सर्वप्रथम सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या छायाचित्राला वाहतो.
आ. घरात काही सुकामेवा आणला किंवा कोणी त्याला चांगले चॉकलेट दिले, तर तो ते गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर ठेवतो.
इ. वार्षिक परीक्षेत तो वर्गात सर्वप्रथम आला. तेव्हा त्याने ‘हे गुण मला गुरुदेवांमुळेच मिळाले आहेत’, असे सांगितले.
ई. अभ्यास करतांना त्याला काही अडचण आली किंवा एखादी अडचण सुटली, तर ‘मला गुरुदेवांनी शिकवले’, असे त्याला वाटते.
उ. ‘प्रत्येक प्रसंगांत सर्वकाही गुरुदेवांच्या कृपेनेच होत आहे’, असा त्याचा भाव असतो.
८. पालकांनी देबप्रसादकडून करून घेतलेले प्रयत्न
अ. प्रत्येक प्रसंगात घरी, शाळेत किंवा मित्रांसमवेत ‘आपले वागणे कसे असायला हवे ?, तसेच आपला सकारात्मक दृष्टीकोन कसा असायला हवा ?’, हे आम्ही त्याला वेळोवेळी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो.
आ. आम्ही (मी, माझे यजमान आणि आमची दोन मुले) एकत्र बसून नामजप करतो.
९. देबप्रसादचे स्वभावदोष
मोठ्याने आणि पुष्कळ बोलणे’
– सौ. बिपाशा प्रमाणिक (वर्ष २०२४ मध्ये आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४४ वर्षे), कोलकाता, पश्चिम बंगाल. (७.३.२०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.