संपादकीय : ‘जिहाद’साठी ‘व्होट’ (मत) !

मालेगाव येथे काही मुसलमानांनी हिंदु युवकांना नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून त्यांच्या आधारकार्डद्वारे ‘नाशिक मर्चंड को. ऑप. बँके’त खाती काढली आणि त्याद्वारे तब्बल ८० ते ९० कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. स्वत:च्या नावावर असलेल्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची कोणतीही कल्पना हिंदु युवकांना नव्हती. त्यानंतर हिंदु युवकांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली असून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या खात्यांमधील पैसा हा मतदारांना आमीष दाखवण्यासाठी वापरण्यात आल्याची दाट शक्यता असून त्या दृष्टीने पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्यापासून आतापर्यंत राज्यात तब्बल ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता विविध अन्वेषण यंत्रणांद्वारे पकडण्यात आली आहे. नागरिकांनाही या नियमित येणार्‍या वृत्तांची सवय झाली आहे. कोट्यवधी रुपयांची रोकड, मद्य, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तू आदी निवडणुकीच्या कालावधीत पकडणे, हे सद्यःस्थितीत नित्याचे झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ पकडणे, रोकड पकडणे या नियमित वृत्तांमुळे कोट्यवधी रुपयांच्या आकड्यांविषयी संवेदनशीलता न्यून होत चालली आहे. त्यामुळे नाशिक येथील प्रकरणही त्याचप्रमाणे आहे, असे काहींना वाटू शकते; मात्र हे प्रकरण वाटते तसे नाही. हा लोकसभेचा तोच मतदारसंघ आहे, जेथे भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांचा पराभव केवळ ४ सहस्र ५४२ मतांच्या फरकाने झाला. या लोकसभा मतदारसंघात मालेगाव या केवळ एका विधानसभा मतदारसंघातील मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांच्या मताधिक्यांमुळे भामरे यांचा पराभव झाला. हा प्रकार केवळ मालेगाव येथे झाला, असे नाही, तर धुळे, मुंबई येथेही मुसलमानांची एकगठ्ठा मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पडली होती. धर्माच्या आधारे मते मागणे हा गुन्हा समजला जातो; पण मुसलमानांची एकगठ्ठा मते जर हिंदुत्वनिष्ठ उमेदवारांना पराभूत करण्यासाठी पडत असतील, तर त्याचे काय ? हाच ‘व्होट जिहाद’ होय !

देशातील पहिल्या निवडणुकीपासूनच ‘व्होट जिहाद’ !

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रचाराच्या सभांमध्ये ‘व्होट जिहाद’ हा शब्दप्रयोग वापरणे हा गुन्हा ठरत नाही का ?’, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी याविषयी ‘कायदेशीर सल्ला घेऊ’, असे उत्तर दिले. निवडणुकीत धर्माच्या आधारे मते मागणे हा गुन्हा असेल, तर मग धर्माच्या आधारे मतदान होत असेल, तर काय ? हाही प्रश्न निर्माण होतोच. आतापर्यंत मुसलमान मागास आहेत, म्हणून त्यांना सवलती दिल्या जात आहेत; परंतु धर्माविषयी मुसलमान यापूर्वीही मागास नव्हते आणि आताही नाहीत. मुसलमान स्वत:च्या धर्माविषयी अत्यंत सजग आणि सतर्क आहेत. मालेगाव येथे हिंदु युवकांच्या नावाने मुसलमानांनी काढलेल्या बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये कुठे वापरण्यात आले ? याचा शोध लागेल तेव्हा लागेल; मात्र ‘व्होट जिहाद’ हा शब्दप्रयोग या लोकसभा निवडणुकीमध्ये पुढे आला असला, तरी हा जिहाद जेव्हापासून भारतात निवडणूक प्रक्रिया चालू झाली, तेव्हापासूनच आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे.

…तर सर्वच मुसलमानबहुल मतदारसंघांचा नेते मुसलमान ठरवतील !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निवडणुकीत ‘व्होट जिहाद’ होत असल्याचे हिंदूंना समजायला वर्ष २०२४ ची लोकसभा निवडणूक उजाडली असली, तरी हे सत्य काँग्रेसच्या नेत्यांनी देश स्वतंत्र झाल्यापासूनच जाणले होते. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर ७० हून अधिक वर्षे भारतात काँग्रेसची सत्ता होती. या सत्ताकाळात ‘हिंदूंची नव्हे, तर मुसलमानांची मते एकगठ्ठा मिळतात’, या एकाच कारणामुळे देशात मुसलमानांचे लांगूलचालन चालू आहे. खरेतर स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा भारतात केवळ साडेतीन कोटी मुसलमान होते. हिंदूंच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही लोकसंख्या अत्यल्प वाटत असली, तरी ‘सर्व एकगठ्ठा मते कुणाला द्यायची ?’, याची जाण मुसलमानांना त्या वेळीही होती आणि आताही आहे. वर्ष १९४७ मध्ये साडेतीन कोटी असलेली मुसलमानांची लोकसंख्या वर्ष २०२४ मध्ये २० कोटीच्या वर पोचली असण्याची शक्यता आहे. देशातील साडेतीन कोटी लोकांच्या मतांसाठी मुसलमानांचे इतके लांगूलचालन होत असेल, तर भविष्यात मुसलमानांच्या मतांची संख्या आणखी वाढल्यावर त्यांचे लांगूलचालन किती होईल ?, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे. हा विषय केवळ मुसलमानांचे लांगूलचालन आणि काँग्रेसचा मुसलमानधार्जिणेपणा यांपुरता मर्यादित नाही. वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मालेगावामधील मुसलमानांच्या मतांमुळे अन्य सर्व मतदारसंघांमधील हिंदूंच्या मतांचे मताधिक्य जात असेल, तर भविष्यात देशातील सर्वच मुसलमानबहुल मतदारसंघांमध्ये हा प्रयोग होऊ शकतो. येत्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही याचे पडसाद दिसल्याविना रहाणार नाहीत. भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या निवडणुकीत १४ मतदारसंघांमध्ये ‘व्होट जिहाद’ झाल्याचे म्हटले; परंतु भविष्यात जेथे जेथे मुसलमानबहुल मतदारसंघ आहे, तेथे हिंदुत्वनिष्ठ उमेदवाराचा घात होणार, हे निश्चित आहे.

 हिंदूंनो, वेळीच जागृत व्हा !

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आव्हाड यांच्या विरोधात मुसलमान उमेदवार उभा केला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मुसलमानांची पडलेली एकगठ्ठा मते फोडण्यासाठी ही चाल खेळण्यात आली असली, तरी ‘व्होट जिहाद’वरील हे कायमस्वरूपीचे उत्तर नाही. भविष्यात मुसलमानांची लोकसंख्या १० ते २० टक्क्यांनी वाढली, तरी १४-१५ नव्हे, तर देशातील बहुसंख्य मतदारसंघांत कुणाला निवडून आणायचे, हे मुसलमानांची एकगठ्ठा मते ठरवतील. त्या वेळी देशाची काय स्थिती होईल, याचा हिंदूंनी वेळीच विचार करावा. ही वेळ येईल, तेव्हा मुसलमान त्यांची मते देशाचा विकास पाहून देत नाहीत, तर धर्म पाहून देतात, हे लक्षात येईल. जिहाद्यांचा उद्देश हा भारताच्या इस्लामीकरणाचा आहे; पण मग मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांचा उद्देश यापेक्षा वेगळा आहे का ? जे स्वप्न जिहाद्यांचे आहे, तेच एकगठ्ठा मतांचे आहे. त्यामुळे हिंदूंनो, वेळीच जागृत व्हा !

मुसलमानांची एकगठ्ठा मते कुणाला निवडून आणायचे हे ठरवतील, त्या वेळी देशाची काय स्थिती होईल ? याचा विचार करावा !