Muslim MLAs In Deepotsava : प्रशासनाने मुसलमान आमदारांना बोलावल्याचा हिंदूंकडून विरोध
|
हरिद्वार (उत्तराखंड) – येथे ‘हर की पैडी’च्या ठिकाणी ११ नोव्हेंबर या दिवशी दीपोत्सव साजरा करण्यासाठी मुसलमान आमदारांना दिलेल्या निमंत्रणावरून वाद निर्माण झाला. मुळात या भागात अहिंदूंना येण्याची अनुमतीच नाही. या निमंत्रणावरून हरिद्वार जिल्हा प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या आक्षेपानंतर प्रशासनाने ‘हर की पैडी’ येथे होणार्या कार्यक्रमात अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घातली आहे, असे स्थानिक सूत्रांनी सांगितले. हरिद्वारच्या जिल्हा दंडाधिकार्यांनी ही बंदी घातली.
१. उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या २५ वर्षांच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जाणार होता. यामध्ये हरिद्वारच्या लोकांना दिवे लावण्यास सांगण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सरकारकडून ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ५०० ड्रोनसह हा कार्यक्रम केला गेला. भजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेदेखील उपस्थित होते. हरिद्वार जिल्हा प्रशासनाने याच कार्यक्रमासाठी काही आमदारांनाही आमंत्रित केले होते. पिराणचे काँग्रेस आमदार कलियार फुरकान अहमद, लक्सरचे बहुजन समाज पक्षाचे आमदार महंमद शहझाद आणि मंगलोरचे काँग्रेस आमदार काझी निजामुद्दीन यांना निमंत्रण पाठवण्यात आले होते.
२. या ३ आमदारांना पाठवण्यात आलेल्या निमंत्रणाला श्री गंगा सभेने आक्षेप घेतला. ही सभाच येथे गंगानदीची आरती आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करते. श्री गंगा सभेने म्हटले आहे की, अहिंदू प्रत्येक दारात येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बोलावणे योग्य नाही. ‘मुसलमान आमदारांना बोलावणे, हा नियमांचा अपमान आहे आणि तसे होऊ दिले जाणार नाही’, असे विधानसभेने म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाला ‘हर की पैडी’च्या नियमांची माहिती नाही आणि अहिंदूंवर बंदी घालण्याचा नियम १०० वर्षांहून अधिक जुना आहे.
३. राज्याचे माजी राज्यपाल अझीझ कुरेशी आणि मार्गारेट अल्वा हेदेखील ‘हर की पैडी’ व्यतिरिक्त वेगळ्या ठिकाणाहून मागील कार्यक्रमाला उपस्थित होते. हा नियम वर्ष १९१६ पासून लागू आहे आणि येथे गंगा आरती चालू करतांना ब्रिटिशांकडून पंडित मदन मोहन मालवीय यांनीही त्याची अंमलबजावणी करवून घेतली होती.
संपादकीय भूमिकाउत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना कशी घडते ? हे हिंदूंना अपेक्षित नाही ! |