Karnataka Minister Remarks On Kumaraswamy : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री जमीर अहमद खान यांनी केंद्रीय मंत्र्यांना म्हटले ‘कालिया’ !

कर्नाटकचे गृहनिर्माणमंत्री बी.झेड. जमीर अहमद खान व केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच्.डी. कुमारस्वामी

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांना कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील गृहनिर्माणमंत्री बी.झेड. जमीर अहमद खान यांनी ‘कालिया’ असे संबोधले. ते विधानसभेच्या चन्नापटना येथील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सी.पी. योगेश्‍वर यांच्या प्रचारासाठी आले असतांना बोलत होते. कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी येथून जनता दल (सेक्युलर) पक्षाकडून निवडणूक लढवत आहे.

जमीर अहमद खान यांच्या या विधानावरून जनता दल (सेक्युलर) पक्षाने खान यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. पक्षाने म्हटले आहे की, खान यांचे विधान वर्णद्वेषी आहे. खान यांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, एच्.सी. महादेवप्पा, सतीश जारकीहोली, प्रियांक खरगे आणि के.एच्. मुनियप्पा यांचा रंग ठाऊक असावा.

जमीर अहमद खान यांनी त्यांच्या विधानावरून स्पष्टीकरण देतांना म्हटले की, माजी मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी मला ‘कुल्ला’ (बुटका) म्हणत. मी त्यांना ‘करियान्ना’ (काळा भाऊ) म्हणत आलो आहे. कुणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या मंत्र्यांची ही मानसिकता पहाता असे वर्णद्वेषी विधाने करणार्‍यांना अटक करून कारागृहात टाकले पाहिजे !