Congress Oppose To Sri Sri RaviShankar : श्री श्री रविशंकर यांचे गुरुपूजन बंद पाडण्याचा प्रयत्न !
|
मुंबई – आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरच्या वतीने धारावी येथे आयोजित श्री श्री रविशंकर यांची गुरुपूजा काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचे पती राजू गोडसे यांनी बंद पाडली. या वेळी त्यांनी दादागिरी करत प्रचंड गोंधळ घातला. या प्रसंगी तेथे दीड सहस्रांहून नागरिक उपस्थित होते.
Attempt to disrupt Sri Sri Ravi Shankar’s (@Gurudev) Guru Poojan!
Arrogance of Congress MP Varsha Gaikwad’s husband Raju Godse!
1,500 people present at the event terrified.
Strong condemnation of Gaikwad family and Raju Godse! – Prashant Vhatkar, @ArtofLiving Dharavi.… pic.twitter.com/wRvWmJC6iQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 12, 2024
कार्यक्रम चालू असतांना राजू गोडसे त्यांच्या कार्यकर्त्यांसह आत घुसले आणि त्यांनी उद्दामपणा करत गुरुपूजा बंद पाडली. ‘या कार्यक्रमाच्या आडून मतदारांना प्रलोभन दाखवले जात आहे’, असा खोटा आरोप त्यांनी केला. कुकर आणि पैसे वाटप केले जात असल्याचाही आरोप या वेळी करण्यात आला. पोलीस आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी यांनी तेथे कसून पडताळणी केली; मात्र पैसे किंवा भेटवस्तू वाटपाचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. ‘तेथे जमलेले दीड सहस्र लोक घाबरले होते. राजू गोडसे यांचे गुंड कधीही अंगावर धावून येतील, अशी स्थिती होती’, अही माहिती आयोजक प्रशांत व्हटकर यांनी दिली.
गायकवाड कुटुंब आणि राजू गोडसे यांचा तीव्र निषेध ! – प्रशांत व्हटकर, आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर, धारावी‘आम्ही असा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित केलेला नाही. प्रत्येक आठवड्याला धारावीत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर’च्या वतीने अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आम्ही कोरोनाकाळात अन्नधान्याची १ लाखांहून अधिक पाकिटे वाटली, तेव्हा काँग्रेसच्या तत्कालीन आमदार मतदारसंघात फिरकत नव्हत्या. आता केवळ राजकीय हेतूने बनाव रचून आम्हाला अपकीर्त केले जात आहे. या कृत्याविषयी मी संपूर्ण गायकवाड कुटुंब आणि राजू गोडसे यांचा तीव्र निषेध करतो. काही महिन्यांपूर्वी धारावीत अरविंद वैश्य या युवकाची आतंकवाद्यांनी हत्या केली होती. त्याच्या अंत्ययात्रेवरही कट्टरपंथियांनी दगडफेक केली; मात्र त्यांना रोखण्याचा प्रयत्न वर्षा गायकवाड यांनी कधी केला नाही. मशिदीवरील कारवाई थांबवण्यासाठी मात्र त्या लगेच आल्या. हिंदूंच्या म्हणण्याकडे त्यांनी का दुर्लक्ष केले ?, याचे उत्तर वर्षा गायकवाड आणि त्यांच्या गुंडांनी द्यावे. |
संपादकीय भूमिकापुन्हा एकदा काँग्रेसचा हिंदुद्वेष उघड ! अन्य धर्मियांच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी असा प्रकार करण्याचे कुणाचे धाडस कधी होते का ? |