Ballistic Missile SURYA : भारत अमेरिकेपर्यंत मारा करणारे ‘सूर्या’ क्षेपणास्त्र बनवत असल्याचा पाकच्या प्राध्यपकाचा दावा
भारताने दावा फेटाळला !
नवी देहली – भारताने आतापर्यंत अनेक स्वदेशी आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची निर्मिती केलेली आहे. त्यांची मारक क्षमता आशिया आणि युरोप खंडांपर्यंत आहे. आता भारत अमेरिकेपर्यंत मारा करणारे ‘सूर्या’ नावाचे क्षेपणास्त्र बनवत आहे, असा दावा पाकिस्तानच्या संरक्षण तज्ञाने केला. इस्लामाबाद येथील कायद-ए-आझम विश्वविद्यालयातील ‘स्कूल ऑफ पॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स’मधील तज्ञ प्रो. जफर नवाझ जसपाल यांनी हा दावा केला आहे.
१. भारताच्या प्रस्तावित ‘सूर्या’ क्षेपणास्त्राची मारक क्षमता १० सहस्र ते १२ सहस्र किलोमीटर इतकी असणार आहे, असा जसपाल यांनी दावा केला आहे.
२. भारताच्या डी.आर्.डी.ओ.ने सातत्याने हे नकारले आहे. डी.आर्.डी.ओ.ने म्हटले की, भारत कोणत्याही सूर्या क्षेपणास्त्र प्रकल्पावर काम करत नाही. भारताचा विचार रणनीतीला आवश्यकतेनुसारच संरक्षणात्मक क्षमता वाढवण्यावर आहे. सध्याच्या काळात अग्नी क्षेपणास्त्राच्या पल्ल्यापेक्षा अधिक अंतरावर मारा करणार्या कोणत्याही प्रकल्पाचा विचार नाही.
३. भारताच्या ‘अग्नी -५’ या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ५ सहस्र ५०० ते ६ सहस्र किलोमीटर इतकी आहे. या क्षेपणास्त्राची संपूर्ण आशिया आणि युरोप पर्यंतच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करण्याची क्षमता आहे.