TMC MP Stopped Jagran Program : नवी देहलीत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी आईच्या आजाराच्या नावाखाली थांबवला देवीच्या जागरणाचा कार्यक्रम !
हिंदु भाविकांचा संताप
नवी देहली – तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी आईच्या आजाराचे कारण देत येथील सिंधू गोमती अपार्टमेंटमध्ये देवीच्या जागरणाचा कार्यक्रम पोलिसांना पाठवून रोखला. या घटनेवरून स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. लोकांचे म्हणणे आहे की, हा जागरणाचा कार्यक्रम प्रतिवर्षी होत असतो; परंतु या वेळी खासदारांनी पोलिसांना पाठवून कार्यक्रम थांबवला.
१. एका रहिवाशाने सांगितले की, खासदार गोखले मंडपामध्ये आले आणि म्हणाले की, मी इतका मोठा आवाज होऊ देणार नाही. माझ्या आईला हृदयविकाराचा आजार आहे. जर त्यांना काही झाले, तर तुमचे नाव समोर येईल.
२. रहिवाशांनी सांगितले की, त्यांच्या आईच्या तब्येतीमुळे ते प्रतिवर्षी सोसायटीमध्ये जागरण करू देत नव्हते, ज्यामध्ये आजूबाजूचे लोक सहभागी होतात. आम्हाला जागरण हळू आवाजात करायचे होते. आम्ही शांतपणे ते करण्यासाठी सिद्ध होतो; पण खासदार आले आणि त्यांनी जागरण थांबवण्यासाठी पोलिसांना बोलावले. जागरणमध्ये महिला, लहान मुले आणि वृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते; पण त्यांचे कुणीही ऐकले नाही.
३. या संदर्भात नागरिकांनी देहली भाजपचे माजी अध्यक्ष आदेश गुप्ता यांच्याकडे तक्रार केली. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना आदेश गुप्ता म्हणाले की, हा जागरणाचा कार्यक्रम येथे गेल्या २५ वर्षांपासून होत आहे आणि त्यात कधीही अडथळा आला नाही; पण सनातन धर्माच्या विरोधात असणार्यांचा चेहरा उघड झाला आहे. देव तृणमूल काँग्रेसच्या खासदाराला सद्बुद्धी देवो.
संपादकीय भूमिकावर्षाचे ३६५ दिवसांत प्रतिदिन ५ वेळा होणार्या अजानामुळे (नमाजासाठी बोलावणे) साकेत गोखले यांना काहीच त्रास होत नाही; मात्र एक रात्रीच्या देवीच्या जागरणाचा त्रास होतो, यातून त्यांची खरी मानसिकता स्पष्ट होते ! |