‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक विपुल शहा यांना ‘लव्ह जिहाद’चा ग्रंथ भेट !
जळगाव – येथे दैनिक ‘तरुण भारत’च्या वतीने ‘स्टोरी बिहाईंड केरला स्टोरी’ या विषयावर ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. विपुल शहा यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्री. शहा यांना हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेकडून ‘लव्ह जिहाद’चा ग्रंथ भेट देण्यात आला.
श्री. शहा व्याख्यानात म्हणाले, ‘‘हिंदु युवतींना हिंदु धर्माचे शिक्षण नसल्याने त्यांना कुणीही फूस लावू शकतो. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. केरळमधील अशा सहस्रो हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे. चित्रपटात अतीरंजित काहीही दाखवलेले नसून वास्तव दाखवलेले आहे. त्यामुळे आपण सतर्क राहून यासंबंधी कार्य करायला हवे.’’