रेल्वेस्थानकावर हरवलेल्या ८६१ बालकांना पालकांकडे सोपवले !
रेल्वे संरक्षण दलाची कामगिरी !
मुंबई – मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाच्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’च्या अंतर्गत एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत हरवलेल्या ८६१ बालकांना त्यांच्या पालकांकडे रेल्वे संरक्षण दलाने सोपवले आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ हे अभियान रेल्वेस्थानकावर हरवलेल्या बालकांसाठी चालू करण्यात आले आहे.