नायलॉन मांजामुळे ९ वर्षांच्या मुलाचा मृत्यू !
नाशिक – येथे पतंग उडवतांना नायलॉन मांजामुळे मांडीला गंभीर दुखापत होऊन अतीरक्तस्रावामुळे विष्णु जोशी (वय ९ वर्षे) या मुलाचा मृत्यू झाला. पतंग खेळणार्या मुलांना पहात असतांना नायलॉन मांजा विष्णूच्या मांडीत अडकला. गुडघ्याच्या मागून रक्तस्राव होऊ लागला. उपचारांसाठी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. यानंतर नायलॉन मांजाचा वापर करणार्यांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
संपादकीय भूमिकाजीवघेण्या नायलॉन मांजावर बंदी कधी येणार ? |