आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ !
वाशी – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात जुन्या कांद्याचे दर १ किलोला ५५ ते ६० रुपये किलो झाले आहेत.
१. घाऊक बाजारात कांद्याच्या सरासरी १०० ते १५० गाड्या येत होत्या. आता जुना कांदा संपू लागला आहे. त्यामुळे जुन्या आणि नव्या कांद्याच्या मिळून ८० ते ९० गाड्या येत आहेत.
२. पुण्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, मंचर, आळेफाटा, ओतूर आदी भागांतून कांद्याची आवक होत आहे.
३. जुना सुका कांदा अगदी अल्प प्रमाणात येत आहे. तो साठवणीतील शेवटचा कांदा असल्याने त्याचा दर्जाही सुमारच आहे. जो काही कांदा आहे, त्याला चांगला भाव मिळत आहे.