Syro Malabar Church Kerala : केरळमध्ये वक्फ बोर्डाच्या विरोधात ‘सिरो मालाबार चर्च’कडून आंदोलन !
|
कोची (केरळ) – येथे वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात १ सहस्र चर्चची संघटना असणार्या ‘सिरो मालाबार चर्च’कडून आंदोलन करण्यात येत आहे. चर्चचा विरोध कोचीतील मुनंबम् आणि चेराई या गावांतील भूमीच्या वादाविषयी आहे. चर्चच्या लोकांचा आरोप आहे की, वक्फ बोर्ड मोठ्या प्रमाणात गावकर्यांच्या भूमीवर नियंत्रण मिळवत आहे. सिरो मालाबार चर्चचे मुख्य मेजर आर्चबिशप (वरिष्ठ पाद्री) राफेल थाटिल यांनी केंद्र आणि राज्य सरकार यांना या प्रकरणी हस्तक्षेप करून तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
🚨Syro Malabar Church Kerala: Protest by the ‘Syro Malabar Church’ in #Kerala against the #WaqfBoard
📌The ‘Syro Malabar Church’ is an organization of 1,000 churches.
📌Waqf Board claims over two Christian-majority villages; the #Church opposes!
👉Why don’t the #Christians… pic.twitter.com/rHtqVLoOLf
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 11, 2024
मुनंबम् आणि चेराई या गावांतील गावकर्यांची भूमी अन् मालमत्ता यांवर वक्फ बोर्ड अवैधपणे नियंत्रण मिळवू पहात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावात ख्रिस्ती कुटुंबे रहात आहेत. ते त्यांच्या मालमत्तेवर सरकारी करही भरत आहेत. त्यांच्याकडे याविषयी कागदपत्रे आहेत. असे असतांना आता या भूमीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. ‘भूमीची नोंदणी स्थानिक गावकर्यांच्या नावे आहे; मग त्यावर वक्फ बोर्ड दावा कसा करू शकतो ?, असा गावकर्यांचा प्रश्न आहे.
यावरून ठिकठिकाणी लोकांचा विरोध वाढत आहे. जर हे सूत्र निकाली काढले नाही, तर आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संपादकीय भूमिका
|