अल्पवयीन मुलाकडून आईच्या गळ्यावर चाकूने वार !
आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना !
मुंबई – घरगुती वादातून अल्पवयीन मुलाने त्याच्या आईच्या गळ्यावर चाकूने वार केले. हा प्रकार चुनाभट्टी परिसरात घडला आहे. घायाळ झालेल्या महिलेला रुग्णालयात उपाचारासाठी भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून १५ वर्षांच्या आरोपी मुलाला कह्यात घेतले असून त्याला डोंगरीतील बालनिरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. घायाळ महिला बोलण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे तिच्याकडून घटनेची माहिती अद्याप मिळाली नाही.