प्रवाशांच्या हरवलेल्या आणि विसरलेल्या मौल्यवान वस्तू परत केल्या !
मध्य रेल्वेच्या कर्मचार्यांचा स्तुत्य प्रयत्न !
मुंबई – मध्य रेल्वेच्या कर्तव्यावर असणार्या कर्मचार्यांनी प्रवाशांच्या हरवलेल्या आणि विसरलेल्या मौल्यवान वस्तू त्यांना परत केल्या आहेत. यासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेचे आभार मानत कौतुक केले. मध्य रेल्वे आणि रेल्वे सुरक्षा दलाने जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ या काळात तब्बल ४.६० कोटी रुपयांच्या वस्तू आणि सामान शोधले अन् ते प्रवाशांना परत केले.
प्रवाशांच्या पर्स, बॅग, भ्रमणसंगणक (लॅपटॉप), महत्त्वाची कागदपत्रे, क्रेडिट/डेबिट कार्ड यांसारख्या मौल्यवान वस्तू गाड्यांमध्ये आणि स्थानकावर विसरल्याच्या, तसेच गहाळ झाल्याच्या घटना घडल्या होत्या. ‘अमानत’ या ऑपरेशन अंतर्गत रेल्वे सुरक्षा दल प्रवाशांना साहाय्य करत आहे.