वाहन दुरुस्ती करण्याच्या सेवेसाठी आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता !
सर्व वाचक, हितचिंतक, राष्ट्रप्रेमी हिंदु आणि साधक यांना सेवेची सुवर्णसंधी !
‘रामनाथी (गोवा), देवद (पनवेल), मिरज (सांगली) येथे सनातनचे आश्रम आहेत, तर अनेक ठिकाणी सेवाकेंद्रे आहेत. या ठिकाणी विविध सेवांसाठी दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची दुरुस्ती करू शकणार्यांची तातडीने आवश्यकता आहे. वाहन दुरुस्ती करण्याचे कौशल्य असणारे पूर्णवेळ अथवा काही दिवस आश्रमात राहून या सेवेत सहभागी होऊ शकतात.
जे वाचक, हितचिंतक आणि हिंदु राष्ट्रप्रेमी ही ‘सेवा’ म्हणून करण्यास किंवा सेवामूल्य घेऊन करण्यास इच्छुक असतील, त्यांनी स्थानिक साधकांच्या माध्यमातून जिल्हासेवकांशी संपर्क करावा. इच्छुक साधक, तसेच साधकांचे परिचित अथवा नातेवाईक या संदर्भात जिल्हासेवकांशी थेट संपर्क साधू शकतात.
जिल्हासेवकांनी सर्व इच्छुकांची माहिती बाजूच्या सारणीनुसार sanatan.sanstha2025@gmail.com या संगणकीय पत्त्यावर कळवावी. याविषयी काही शंका असल्यास सौ. भाग्यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या क्रमांकावर संपर्क साधावा.
(९.११.२०२४)