येवला (नाशिक) येथील सौ. सुजाता गुप्ता यांना रामनाथी आश्रमात प्रवेश करतांना आलेल्या अनुभूती !
‘मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याचा योग आला. आमचे वाहन आश्रमाच्या आवारात प्रवेश करत असतांना मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. रामनाथी आश्रम सोनेरी रंगाचा आहे. तो चैतन्याचा स्रोतरूपी गोळा आहे. या गोळ्यात मी प्रवेश करत आहे.
२. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच माझ्या देहावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण दूर झाले आहे आणि मी पुढे पुढे जात आहे.
३. आश्रमातील वस्तू पांढर्या शुभ्र आहेत.
४. आश्रमातील साधक उच्च लोकातून आले आहेत. त्यांनी पांढर्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यांच्या चेहर्यावर स्मित हास्य आहे.’
– सौ. सुजाता गुप्ता, येवला, नाशिक. (६.७.२०२४)
|