पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्या आजारपणात नामजपादी उपाय करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली. पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय शोधून दिले, तसेच अन्य साधकांना उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय करवून घेतले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे पाहूया.
१. प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार आणि पू. दातेआजी यांच्यासाठीचे उपाय यांमधील भेद !
प्रश्न : प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार शोधलेले उपाय आणि सध्या पू. दातेआजींसाठी करत असलेले नामजपादी उपाय सर्वांना लागू पडतात का ?
प.पू. डॉक्टर : नाही. हे उपाय सर्वांसाठी नाहीत.
प्रश्न : प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय शोधतांना (अंगठा सोडून हाताची उर्वरित बोटे अडथळ्याच्या स्थानी शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून) मुद्रा करून स्वाधिष्ठानचक्रापासून आरंभ करून वरील चक्रांच्या दिशेने नेतो; परंतु आपण पू. दातेआजींच्या चरणांपासून आरंभ करायला सांगितले. या दोन्हींमधील भेद काय आहे ?
प.पू. डॉक्टर : प्राणशक्तीवहन पद्धतीत अडथळा असतो. तो अडथळा पाऊल, गुडघा किंवा मांडी, असा कुठेही असू शकतो. आता सांगितलेले उपाय हे शिकण्यासाठी आणि तो अडथळा दूर करण्यासाठी आहेत. तो अडथळा दूर झाल्यानंतर प्राणशक्तीचे वहन सुरळीत होईल. आध्यात्मिक स्तरावरील उपाय करतांना ईश्वराकडून काही प्रमाणात चैतन्य (पू. दातेआजींच्या शरिरात) जाते आणि काही प्रमाणात पू. आजींकडून चैतन्य प्रक्षेपित होते. त्यामुळे अडथळ्यांचे स्थान वरच्या दिशेने जाऊ लागते.
२. नामजपादी उपाय करणार्यांची पातळी किती असावी ?
प्रश्न : ज्याच्यासाठी उपाय करतो ( रुग्ण) ती व्यक्ती आणि उपाय करणारी व्यक्ती यांची आध्यात्मिक पातळी किती असावी ?
प.पू. डॉक्टर : दोघेही संत पातळीचे असावेत, म्हणजेच दोघांचीही आध्यात्मिक पातळी किमान ७० टक्के असावी.
प्रश्न : आपत्काळाच्या वेळी अशा प्रकारे संत दुसर्या संतांसाठी उपाय करू शकतात का ? तसेच हे उपाय केवळ समष्टी संतांवर करू शकतो कि व्यष्टी संतांवरही करू शकतो ?
प.पू. डॉक्टर : हे उपाय केवळ एक संत दुसर्या संतांवर करू शकतात. व्यष्टी संत किंवा समष्टी संत यापेक्षा त्यांची आध्यात्मिक पातळी (किमान ७० टक्के असणे) महत्त्वाची आहे.
३. अधिक परिणामासाठी कोणत्या भाषेतून जप करावा !
प्रश्न : काही साधक अमराठी किंवा इंग्रजी बोलणारे असतात. अशा वेळी नामजपादी उपायांसाठी अंक जप आला असेल, उदा. १०, तर त्यांनी मराठीत ‘दहा (१०)’ असा जप करणे परिणामकारक ठरेल कि इंग्रजीत ‘टेन’ (10) म्हटले, तरी त्याचा परिणाम तेवढाच होईल ?
प.पू. डॉक्टर : संस्कृत भाषा सर्वाधिक सात्त्विक आहे. मराठी भाषा संस्कृतमधून निर्माण झाली आहे. त्यामुळे इंग्रजीतील ‘टेन’च्या (10) तुलनेत मराठीतील ‘दहा (१०)’ अधिक परिणामकारक होईल.
प्रश्न : पूर्वी एकदा आपण म्हणाला होतात की, अन्य भाषांचा उपयोग केल्यास त्याची परिणामकारकता अर्धी किंवा ३० टक्के एवढी अल्प होते.
प.पू. डॉक्टर : हो.
– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.७.२०२४)