भगवंताची जाणीव ठेवण्यामागील महत्त्व !
मनुष्य कसाही असला, तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल. जो भगवंताचा झाला, त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही. विषयाचा आनंद हा दारूसारखा आहे. त्याची धुंदी उतरल्यावर मनुष्य अधिक दुःखी बनतो. ‘मी भगवंताचा आहे’, या भावनेने जो राहील, त्यालाच खरा आनंद भोगता येईल. भोग आणि दुःख यांत वेळ न घालवता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे. ‘भगवंत हा कर्ता आहे’, अशी आपली दृढ भावना झाली की, आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगत बसणार नाही. ‘भगवंताला माझे सर्व कळते’, असे जर खरेच वाटले, तर त्याला आवडेल असेच आपण वागू.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज