भावपूर्ण साष्टांग नमस्कार सद्गुरु राजेंद्रदादांच्या चरणी ।
‘गुरुदेवा (टीप १), तुम्ही सद्गुरु दादा (टीप १) दिले आम्हा साधनेत साहाय्य करण्यासी ।
शिकवले त्यांनी आम्हा प्रक्रिया (टीप २) मनापासून करण्यासी ।
निर्माण केली गोडी आमच्यात व्यष्टी साधना चांगली करण्याची ।
केले स्वयंपूर्ण आम्हाला लढण्या स्वभावदोषांशी ।। १ ।।
सद्गुरु दादांनी बसवली घडी आमच्या सेवा आणि साधना यांची सहजतेने ।
घेतले प्रयत्न करून स्वभावदोषांवर मात करण्याचे सहजतेने ।।
शिकवले आम्हा भावाच्या स्तरावर रहाण्यासी सहजतेने ।
प्रक्रिया करून घेतली मन नि चित्त शुद्धीची सहजतेने ।। २ ।।
सद्गुरु दादांनी जळमटे केली दूर नकारात्मक विचारांची सहजतेने ।
घडवले आम्हा जाण्यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणांशी सहजतेने ।।
प्रसंगात न डगमगता स्थिर रहाण्यास केले आम्हा सिद्ध सहजतेने ।
निराशेत न जाता करण्यास शिकवले साधनेचे प्रयत्न सहजतेने ।। ३ ।।
‘ईश्वरेच्छेने सर्व होते’ सद्गुरु दादांनी बिंबवले आमच्या मनी ।
‘अशक्य ते शक्य होते साधनेने’ गोंदले आमच्या मनी ।
‘प्रक्रियेमुळे साधक जातो देवाच्या चरणी’ कोरले आमच्या मनी ।
‘आपत्काळात रहावे भावाच्या स्थितीत’ ठसवले आमच्या मनी ।। ४ ।।
सद्गुरु दादांनी रात्रंदिवस घेतले कष्ट, वर्णू कसे ।
ध्यास आम्हा घडवण्याचा तयांचा, ते वर्णू कसे ।
नेण्या प्रत्येक साधकास पुढे, चिकाटी वर्णू कशी ।
करण्या साहाय्य साधकास, तळमळ वर्णू कशी ।। ५ ।।
कशी व्यक्त करू कृतज्ञता परात्पर गुरुदेवा ।
धन्य आम्ही साधक, लाभले आम्हा सद्गुरु राजेंद्रदादा ।
व्यक्त करूया कृतज्ञता शरणागत होऊनी ।
भावपूर्ण साष्टांग नमस्कार सद्गुरु राजेंद्रदादांच्या चरणी ।। ६ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
टीप २ – सद्गुरु राजेंद्र शिंदे
टीप ३ – स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया
– वैद्या (सुश्री) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.९.२०२१)