BJP’s Manifesto Ladaki Bahin : लाडकी बहीण योजना आणि वृद्धांना निवृत्ती वेतन यांची रक्कम २ सहस्र १०० रुपये करणार !
भाजपचे निवडणूक घोषणापत्रात आश्वासन
मुंबई – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अंतर्गत महिलांना देण्यात येणारी १ सहस्र ५०० ही रक्कम वाढवून ती २ सहस्र १०० रुपये करण्यात येईल, तसेच वृद्धांच्या निवृत्ती वेतनही १ सहस्र ५०० वरून २ सहस्र १०० रुपये इतकी वाढवण्यात येईल, असे आश्वसान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० नोव्हेंबर या दिवशी प्रकाशित केलेल्या भाजपच्या घोषणापत्रात दिले.
घोषणापत्रात दिलेली आश्वासने !
१. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार
२. शेतकर्यांना कर्जमुक्त करणार, तसेच शेतकर्यांसाठी ‘भावांतर योजना’ आणणार
३. १ लाखांहून अधिक सरकारी नोकर्या देणार, तसेच २५ लाख रोजगार निर्मितीचे उदिष्ट ठेवणार
४. वर्ष २०२७ पर्यंत ५९ लाख ‘लखपती दीदी’ बनवणार
५. महाराष्ट्रात ‘कौशल्य जनगणना’ करणार, ‘विद्या वेतना’च्या माध्यमातून १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार
६. गड-दुर्गांसाठी प्राधिकरण निर्माण करणार
या प्रसंगी अमित शहा यांनी ‘मी महाराष्ट्रातील जनतेला महायुती सरकारला सलग तिसर्यांदा जनादेश द्यावा’, अशी विनंती राज्यातील जनतेला केली.