UN On Gaza War : गाझा पट्टीत ७० टक्के महिला आणि मुले ठार झाल्याचा संयुक्त राष्ट्रांचा दावा
न्यूयॉर्क (अमेरिका) – गेल्या वर्षभरापासून इस्रायलकडून गाझा पट्टीत हमासच्या आतंकवादी तळांवर आक्रमणे केली जात आहेत. येथील जवळपास ८० टक्के इमारती विदीर्ण झाल्या आहेत. गाझातील ७० टक्के महिला आणि मुले ठार झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आली आहे. या युद्धात आतार्यंत ८ सहस्र ११९ जणांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे, तर गाझाच्या अधिकार्यांनी ही संख्या ४३ सहस्र असल्याचा दावा केला आहे.
UN claims 70% of those killed in the Gaza Strip are women and children – Blames #Israel for breaking International Humanitarian laws !
𝐂𝐢𝐯𝐢𝐥𝐢𝐚𝐧𝐬 𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 #GazaStrip 𝐡𝐚𝐯𝐞 𝐠𝐢𝐯𝐞𝐧 𝐟𝐮𝐥𝐥 𝐬𝐮𝐩𝐩𝐨𝐫𝐭 𝐭𝐨 #HamasTerrorists, 𝐰𝐡𝐨 𝐚𝐫𝐞 𝐡𝐢𝐝𝐢𝐧𝐠… pic.twitter.com/9gPg7Ggr57
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 11, 2024
३ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासने इस्रालयवर आक्रमण करून १ सहस्र २०० हून अधिक नागरिकांना ठार मारले, तर २५० हून अधिक लोकांचे अपहरण केले. त्यांच्या सुटकेसाठी इस्रायल सातत्याने आक्रमण करत आहे; मात्र हमासने अद्याप त्यांची सुटका केली नाही, उलट काही जणांची हत्या केली आहे.
संपादकीय भूमिका
|