Complaint Against Bangladesh Chief In ICC : बांगलादेशातील हिंसाचाराच्या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार प्रविष्ट (दाखल)
नवी देहली – बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांच्यासह ६२ व्यक्तींविरुद्ध ८ नोव्हेंबर या दिवशी नेदरलँड्समधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली.
Complaint filed in the International Court of Justice over violence in Bangladesh
Anwaruzzaman Chaudhary, former mayor of Sylhet Municipal Corporation and currently residing in London, is behind the filing of this complaint.
Read more: https://t.co/AgcXsen4jU pic.twitter.com/5NKYNe1aGe
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 13, 2024
सध्या लंडनमध्ये रहाणार्या सिल्हट महानगरपालिकेचे माजी महापौर अन्वरुज्जमान चौधरी यांनी ही तक्रार प्रविष्ट केली आहे, अशी माहिती बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून दिली.
A complaint has been filed in the International Court of Justice against 62 individuals, including Muhammad Yunus, the Chief Adviser of Bangladesh’s interim government. The complaint was filed on Friday, November 8, at the International Court of Justice in The Hague,…
— taslima nasreen (@taslimanasreen) November 9, 2024
नसरीन यांनी पुढे म्हटले आहे की, या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, ५ ते ८ ऑगस्ट २०२४ या काळात बांगलादेशातील विद्यार्थी चळवळीच्या नावाखाली अवामी लीग आणि त्याच्याशी संलग्न संघटनांचे सदस्य, तसेच बांगलादेशात रहाणारे हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध यांच्यासह बांगलादेश पोलिसांच्या विरोधात हिंसाचार करण्यात आला.