विक्रोळी येथे साडपल्या साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा !
मुंबई – विक्रोळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे भरारी पथक यांनी पकडलेल्या वाहनात साडेसहा टन वजनाच्या चांदीच्या विटा सापडल्या. त्यांचे मूल्य कोट्यवधी रुपयांचे आहे. या विटा ‘ब्रिंक्स’ आस्थापनाच्या वाहनातून मुलुंडमधील एका गोदाममध्ये ठेवण्यासाठी नेण्यात येत होत्या. पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात या विटांच्या संदर्भात अधिकृत कागदपत्रे उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. तरीही निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि पोलीस हे या प्रकरणाचे अधिक अन्वेषण करत आहेत.