Rinima Borah : ‘मिसेस इंडिया गॅलेक्सी २०२४’ सौंदर्यस्पर्धा जिंकणार्या रिनिमा बोराह संदर्भात घडली ‘लव्ह जिहाद’ची घटना
‘यू ट्यूब’ वाहिनीवरील मुलाखतीत दिली माहिती
नवी देहली – अबोब भुयान यांच्या ‘अनटोल्ड’ नावाच्या ‘पॉडकास्ट’मध्ये (यू ट्यूब वाहिनीवरील मुलाखतीचा कार्यक्रमात) ‘मिसेस इंडिया गॅलेक्सी २०२४’ या सौंदर्य स्पर्धेतील विजेती रिनिमा बोराह हिने तिच्या संदर्भात लव्ह जिहादची घटना घडल्याची माहिती दिली.
१. आसामची रहिवासी असलेली रिनिमा वयाच्या १६ व्या वर्षी शिक्षण घेण्यासाठी बेंगळुरूला गेली. तेथे तिचे एका मुसलमान तरुणाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. तिला तिचा मुसलमान प्रियकर आणि त्याच्या कुटुंबाने निर्दयपणे मारहाण केली.
२. रिनिमाने सांगितले की, कधीकधी तो माझ्याशी ज्या प्रकारे वागला, त्याविषयी मी त्याला ‘तालिबान’ म्हणायचे. तो मला बेदम मारहाण करायचा. मला गोमांस खायला लावले. त्याच्या पालकांनी मला गोमांस खाण्यास भाग पाडले. हा जवळजवळ लव्ह जिहाद आहे. त्यांनी मलाही नमाजपठण करायला लावले. मी त्याला सोडल्यास तो माझ्यावर आम्ल फेकण्याची धमकी देत होता.
संपादकीय भूमिकालव्ह जिहादच्या विरोधात कितीही कायदे बनवले, तरी धर्मांध मुसलमान त्याला दाद देत नाहीत. त्यामुळे आता अशांना फाशीचीच शिक्षा करण्याचीच तरतूद करणे आवश्यक आहे ! |