फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु मुलीवर तीन मुसलमान तरुणांकडून सामूहिक बलात्कार !
मुलीचे अपहरण करून धर्मांतर !
फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथील एका हिंदु अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याची घटना घडली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फतेहपूर जिल्ह्यातील आंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी असलेल्या या अल्पवयीन मुलीचे लबरी, रोशन आणि इर्शाद नावाच्या मुसलमान तरुणांनी ३ नोव्हेंबर या दिवशी अपहरण केले होते. या तरुणांनी तिला घाटमपूर मशिदीत नेऊन तिचे धर्मांतर केले. त्यानंतर लबरी, इर्शाद आणि रोशन यांनी घाटमपूरमधील पेरूच्या बागेत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असे पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना सांगितले. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदसून लबरी याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांना धर्मांध मुसलमानांचे असे धाडस कसे होते ? पोलीस आणि प्रशासन यांना हे लज्जास्पद ! |