VHP Oppose Banda (UP) Mosque : प्रशासनाने मशीद पाडावी अन्यथा आम्ही पाडू ! – विश्व हिंदु परिषदेची चेतावणी
बांदा (उत्तरप्रदेश) येथील प्राचीन शिवमंदिर असणार्या डोंगरावर मुसलमानांनी अवैधरित्या बांधली मशीद
बांदा (उत्तरप्रदेश) – येथील बांबेश्वर डोंगरावर प्राचीन शिवमंदिर असून तेथे मुसलमानांनी कोरोनाच्या काळात अवैध मशीद बांधली आहे. विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रमोहन बेदी यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून ही मशीद पाडण्याची मागणी केली आहे. या मंदिराशी संबंधित श्रद्धेनुसार भगवान श्रीराम यांनी वनवासाच्या काळात येथील शिवलिंगावर जलाभिषेक केला होता.
१. विहिंपने म्हटले आहे की, जिहादी लोक भारतात इस्लामीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न करत असून अशा प्रकारची कृत्ये विहिंप आणि बजरंग दल सहन करणार नाहीत. मशीद त्वरित हटवली नाही, तर बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद ती पाडतील. या प्राचीन मंदिराचे पुजारी आणि मंदिर समितीचे अध्यक्ष पुत्तन महाराज यांनीही या मशिदीला विरोध केला आहे.
२. विहिंपचे पदाधिकारी अशोक उमर म्हणाले की, येथे ६ हून अधिक थडगी बांधण्यात आली आहेत आणि तेथे शुक्रवारच्या दिवशी नमाजपठण केले जाते. अनुमाने ६ मजारी इस्लामी पीर किंवा फकिर यांचे थडगे) देखील बांधण्यात आल्या आहेत आणि तेथे शुक्रवारची प्रार्थना केली जाते. यापूर्वी या ठिकाणी मुसलमानांची वस्ती नव्हती; परंतु आता मोठ्या संख्येने मुसलमान लोक येथे स्थायिक झाले आहेत. मशीद आणि थडगी विश्व हिंदु परिषद पाडेल आणि त्याला प्रशासन उत्तरदायी असेल. अवैध मशीद आणि मजार बांधणार्यांवर कठोर कारवाई करून त्यांना त्वरित कारागृहात टाकावे.
३. विश्व हिंदु परिषदेचे सरचिटणीस दीपू दीक्षित यांनी म्हटले की, जर हे वेळेवर थांबवले नाही, तर मथुरा आणि काशी यांसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, जी गंभीर समस्या बनू शकते.
संपादकीय भूमिकाप्राचीन मंदिराच्या शेजारी मशीद बांधली जाईपर्यंत हिंदू आणि प्रशासन झोपले होते का ? स्वतःच्या प्राचीन मंदिरांचे संरक्षण करण्याविषयी निष्काळजी रहाणार्या हिंदूंना हे लज्जास्पद ! |