Congress on RSS : महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा विचार करू !
काँग्रेसचे ‘ऑल इंडिया उलेमा बोर्डा’ला लेखी आश्वासन !
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अल्पसंख्यांक मतदारांची मते स्वत:कडे आकर्षित करण्यासाठीचे प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘ऑल इंडिया उलेमा बोर्डा’ने काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे; मात्र बोर्डाने काँग्रेसकडे १७ मागण्या केल्या असून त्या पूर्ण केल्यासच पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. या १७ मागण्यांमध्ये ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणे’ ही मागणीही आहे. उलेमा बोर्डाने केलेल्या मागण्यांसंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लेखी आश्वासन देत सांगितले, ‘‘इंडिया आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर आपल्या मागण्यांच्या कार्यवाहीविषयी निश्चितपणे पाऊले उचलू.’’
या निवेदनावर उलेमा बोर्डाचे अध्यक्ष नायाब अन्सारी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मौलवी अस्मान शेख आणि सरचिटणीस शहाबुद्दीन सौदागर यांची स्वाक्षरी आहे.
उलेमा बोर्डाने केलेल्या मागण्या !१. महाराष्ट्रामध्ये वर्ष २०१२ पासून झालेल्या दंगलींमध्ये मुसलमानांविरुद्ध नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावेत. २. कारागृहात असलेल्या मौलाना सलमान अजहरी यांना सोडण्यासाठी महाविकास आघाडीच्या ३१ आमदारांनी आपापल्या ‘लेटरपॅड’वर सरकारला पत्र द्यावे. ३. महाराष्ट्रामध्ये मशिदींच्या इमामांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रत्येक महिन्याला १५ सहस्र रुपये द्यावेत. ४. महंत रामगिरी महाराज आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांना कारागृहामध्ये टाकण्यासाठी ‘इंडी आघाडी’ने आंदोलन करावे. ५. ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे मुफ्ती मौलाना, आलीम हाफीज मशिदीचे इमाम यांना इंडिया आघाडी सरकार आल्यावर शासकीय समितीवर घेण्यात घ्यावे. ६. विधानसभा निवडणुकीत मुसलमान समाजाच्या ५० उमेदवारांना तिकीट द्यावे. ७. वक्फच्या मालमत्तांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी कायदा करावा. ८. इंडिया आघाडीचा प्रचार करण्यासाठी उलेमा बोर्डाला ४८ जिल्ह्यांमध्ये जी यंत्रणा लागेल ती उपलब्ध करून देण्यात यावी. |
संपादकीय भूमिकाअल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्या आणि भविष्यातही ते करण्याची लिखित स्वीकृती देणार्या काँग्रेसचा हिंदुद्वेष जाणा ! |