विनापरवाना प्रचाराचा ‘एअर बलून’ लावल्याने हॉटेलमालकावर गुन्हा नोंद !
पुणे – फुरसुंगी येथील ‘रॉयल स्टे इन लॉजिंग’ या लॉजच्या गच्चीवर पुरंदर विधानसभा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांचा शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण असलेला ‘एअर बलून’ (हवा असलेला मोठा फुगा) लावून आचारसंहिता भंग केल्याबद्दल हॉटेलमालक अक्षय पवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी शेखर कांबळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
एअर बलूनविषयी अनुमती घेतली आहे का ? याची चौकशी केल्यावर अनुमतीसाठी अर्ज केला आहे, अजून अनुमती मिळाली नाही, असे सांगण्यात आले. आचारसंहिता कक्षाकडे चौकशी केल्यावर बलूनला कोणतीही अनुमती दिली नसल्याचे समजले. त्यानंतर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.