९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री चालू !
मध्य आणि पश्चिम रेल्वेचा निर्णय !
मुंबई – दिवाळी आणि छटपूजा यांच्या कालावधीत पुष्कळ गर्दी होत असल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लावले होते; मात्र ९ नोव्हेंबरपासून फलाट तिकीट विक्री पुन्हा चालू केली आहे.
प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेवरील सी.एस्.एम्.टी., लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, बोरिवली, वसई रोड, वापी, वलसाड, उधना, सुरत या स्थानकात ८ नोव्हेंबरपर्यंत फलाट तिकीट विक्री बंद होती.