सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेले बुद्धीअगम्य प्रश्न आणि श्री. राम होनप यांनी सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे दिलेली त्यांची उत्तरे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी परिधान केलेले सर्व वस्त्रालंकार चैतन्याने भारित करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिरात ठेवण्यात आले होते. या वस्त्रालंकारांना मंदिरात आध्यात्मिक स्तरावरील उपायांना ठेवण्यापूर्वी, मंदिरात १० ते १२ घंटे उपायांसाठी ठेवल्यानंतर आणि ब्रह्मोत्सवानंतर (म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ब्रह्मोत्सवात वस्त्रालंकार परिधान केल्यानंतर) या टप्प्यांप्रमाणे चाचण्या करण्यात आल्या. याविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. मधुरा कर्वे यांच्या मनात निर्माण झालेले काही प्रश्न आणि देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे मी दिलेली त्यांची उत्तरे पुढे दिली आहेत. (भाग ५)
या लेखातील भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/850535.html
प्रश्न क्र. ११
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ब्रह्मोत्सवात वस्त्रालंकार परिधान केल्यानंतर त्यांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन ती ४२ सहस्र ते १ लक्ष मीटर झाली. यामागील कारण काय ?
११ अ. उत्तर
११ अ १. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील चैतन्यामुळे वस्त्रालंकार शुद्ध आणि पावन होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देहातून वातावरणात सातत्याने चैतन्याचे प्रक्षेपण होत असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी वस्त्रालंकार परिधान केल्यावर त्यांच्यातील चैतन्याने वस्त्रालंकार शुद्ध आणि पावन झाले. त्या वस्त्रालंकारांमध्ये देवत्व आल्याने त्यांना ‘दैवी अलंकार’, असे म्हटले आहे.
११ अ २. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांतील चैतन्य सहस्रो वर्षे अक्षय्य स्वरूपात टिकून रहाणार असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे साधकांवर निरपेक्ष प्रेम आहे, तसेच त्यांच्या मनात ‘पृथ्वीवरील सर्व साधकांचे आध्यात्मिकदृष्ट्या कल्याण व्हावे’, असा विचार आहे. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या शरिरातून प्रक्षेपित होणारे चैतन्य वस्त्रालंकारांमध्ये विपुल स्वरूपात घनीभूत झाले आहे. त्या वस्त्रालंकारांतील चैतन्य सहस्रो वर्षे अक्षय्य स्वरूपात टिकून रहाणार आहे. त्याचा आध्यात्मिक लाभ सर्व साधकांना दीर्घकाळ होणार आहे.
११ अ ३. पृथ्वीवरील सर्व संपत्तीचा मालक असलेला कुबेर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर प्रसन्न असणे आणि त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांच्या दर्शनातून साधकांना होणारे लाभ : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या चैतन्यामुळे वस्त्रालंकारांमध्ये दैवी शुद्धता निर्माण झाली आहे. त्या माध्यमातून समाजाला दीर्घकाळासाठी आध्यात्मिक ठेवा मिळाला आहे. या घटनेवर कुबेर प्रसन्न आहे. पृथ्वीवरील सर्व संपत्तीचा मालक कुबेर आहे. सर्वसाधारणपणे कुठलेही अलंकार किंवा नवीन वस्त्रे पाहिल्यावर व्यक्तीच्या मनात बहिर्मुखतेचे किंवा मोहाचे विचार येतात; परंतु कुबेराची प्रसन्नता लाभल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांच्या दर्शनातून साधकांच्या मनात बहिर्मुखता किंवा मोह यांसंबंधीचे विचार येणार नाहीत, तसेच त्यांची वृत्ती अंतर्मुख राहून त्यांना साधना आणि धर्मरक्षण करण्यासाठी दीर्घकाळ ईश्वरी शक्ती अन् प्रेरणा मिळणार आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांमध्ये पुष्कळ चैतन्य आहे. त्यांचे मनोभावे दर्शन घेतल्याने साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमधील देवत्व किंवा अवतारत्व अनुभवता येणार आहे.
११ अ ४. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांवर वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांचा काही काळ प्रभाव न पडणे : कुठल्याही चैतन्यमय वस्तूवर प्रतिकूल काळ आणि वाईट शक्ती यांचा प्रभाव पडल्यावर त्यातील चैतन्य हळूहळू न्यून होत जाते; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर धर्मरक्षणाची सेवा प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थपणे करत आहेत. त्यामुळे त्यांनी ब्रह्मोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण झाले आहे; परिणामी या वस्त्रालंकारांवर पुढील काही सहस्र वर्षे प्रतिकूल काळ आणि वाईट शक्ती यांचा परिणाम होणार नाही.
११ अ ५. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांवर तंत्राचा प्रभाव निर्माण करण्यासाठी ७ व्या पाताळातील तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींना पुष्कळ साधना करावी लागणार असणे : ७ व्या पाताळातील तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींच्या तंत्राचा प्रभाव सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ब्रह्मोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांवर पडला नाही. ‘त्या वस्त्रालंकारांमध्ये पुष्कळ चैतन्य असल्यामुळे त्यांवर पुढील काळातही तंत्रातील त्रासदायक (काळ्या) शक्तीचा प्रभाव पडणार नाही’, हे तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्ती जाणून आहेत. वाईट शक्ती स्वतःचे अपयश कधीच मान्य करत नाहीत किंवा स्वीकारत नाहीत. त्यामुळे ते सूक्ष्मातून परत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे वस्त्रालंकार दूषित करण्याचा प्रयत्न करतील. त्या प्रयत्नांमध्ये यश मिळण्यासाठी तंत्रशिखर आणि तंत्रमेरु यांना पुष्कळ साधना करावी लागेल.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०२३) (क्रमशः पुढच्या रविवारी)
याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/855428.html
|