‘सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने असलेली विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर होणारा परिणाम’, या संदर्भातील संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने असलेली विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. ३ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नकारात्मक स्पंदने असलेली विभूती लावल्याने होणारा परिणाम’, याविषयी वाचले. आता आपण ‘सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारची स्पंदने असलेली विभूती लावल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो?’ ते पाहूया.

(भाग २)

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/850540.html

पू. वामन राजंदेकर

२ आ. ‘विभूती क्र. २’ (सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारची स्पंदने असलेली विभूती) लावल्याचा सर्वांवर नकारात्मक परिणाम होणे आणि तो अनुमाने १ घंटा टिकून रहाणे

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वरील नोंदींच्या तुलनात्मक अभ्यासातून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. विभूती लावल्यानंतर चारही व्यक्तींतील नकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा घटली. विभूती लावल्यानंतर १५ मिनिटांनी त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत आणखी वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणखीन न्यून किंवा नाहीशी झाली.

सौ. मधुरा कर्वे

२. विभूती लावल्यानंतर बालसंतांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा घटली. विभूती लावल्यानंतर १५ मिनिटांनी त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणखीन घटली.

३. सर्वांवर विभूतीचा नकारात्मक परिणाम विभूती लावल्यानंतर १५ मिनिटांनी पूर्णपणे दिसून आला.

४. या विभूतीचा नकारात्मक परिणाम सर्वांवर अनुमाने १ घंटा टिकला.

निष्कर्ष  

सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारची स्पंदने असलेली विभूती लावल्याने सर्वांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर नकारात्मक परिणाम झाला आणि तो अनुमाने १ घंटा टिकून राहिला. यातून विभूतीमध्ये चैतन्य आहे; पण तिच्यावर नकारात्मक आवरण आले असेल, तर व्यक्तीला आध्यात्मिक लाभ होत नाहीत’, हे लक्षात येते. त्यामुळे अशा विभूतीवरील आवरण काढून मगच तिचा वापर करावा.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.९.२०२४)

(क्रमशः पुढच्या रविवारी)

इ-मेल : mav.research2014@gmail.com

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/855450.html

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.