लोकसभेच्या वेळी झालेल्या ‘मतदान जिहाद’च्या प्रक्रियेतून (‘व्होट जिहाद’मधून) शिका !
भारतात या वर्षी लोकसभेची निवडणूक झाली. त्या वेळी ‘व्होट जिहाद’ झाला असल्याचे खुद्द महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात सांगितले. अनेक मशिदी, मदरसे यांतून ‘ठराविक पक्षाला मतदान करा’ अथवा ‘ठराविक पक्षाला अजिबात मत देऊ नका’, असे राज्यघटना आणि लोकशाहीविरोधी कृती सर्रासपणे देशात अनेक ठिकाणी केल्या गेल्या;
पण त्यावर अंकुश ठेवण्यात देशातील शासकीय अन् प्रशासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरली. महाराष्ट्रात मात्र असे कृत्य न होता लोकांना आपल्या विवेकबुद्धीनुसार मतदान करता यावे, अशी स्थिती होईल का ?
लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आणखी एक भाग प्रकर्षाने जाणवला तो, म्हणजे जिथे धर्मांधांची संख्या अधिक आहे, तेथील मतदान केंद्र दिवसभर एक प्रकारे अडवून ठेवण्याचेही प्रकार झाले. याचा थेट परिणाम हिंदु मतदानावर झाला. काम आणि व्यवसाय करणारा, शिक्षण घेणारा हिंदु अधिकाधिक १ घंटा मतदान करण्यासाठी थांबू शकत होता, तिथे ‘त्याला मतदान केंद्रावर मोठी रांग असल्याने १ घंट्यापेक्षा अधिक वेळ लागणार’, हे कळले आणि तो कामासाठी निघून गेला. असे प्रकारही जाणीवपूर्वक हिंदु मतदान न्यून होण्यासाठी केले गेले. अशा सर्व घटनाविरोधी प्रकारापासून हिंदूंनी सावध रहावे आणि विधानसभेसाठी कर्तव्य म्हणून मतदान करावे !
– श्री. प्रशांत हेमंत जुवेकर, जळगाव. (२.११.२०२४)