Karnataka Govt. Buildings ‘Waqf Property’ : बादामी (कर्नाटक) येथील बांधकाम चालू असलेल्या विधानसभेची इमारत ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून नोंद
मठ आणि मंदिरांनंतर आता सरकारी भूमींवर वक्फचा अधिकार
बागलकोट (कर्नाटक) – येथील सरकारी कार्यालयाच्या भूमींच्या सर्वेक्षणात ही कार्यालये वक्फ मालमत्ता म्हणून उल्लेख असल्याचे समोर आले आहे. बादामी शहरातील कालवा इंजिनिअरिंग कार्यालय आणि बांधकाम स्थितीतील मिनी विधानसभा इमारतीच्या पहाणीत त्या वक्फ मालमत्ता म्हणून नोंद असल्याचे दिसून आले. मालकी हक्काच्या रकान्यामध्ये यांचा ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून उल्लेख आहे.
संपादकीय भूमिकायाविषयी आता वक्फचे समर्थन करणारे तोेंड का उघडत नाहीत ? |