Karnataka Waqf Donations : कर्नाटकात मुसलमानांकडून वक्फसाठी भूमी दान करण्यास टाळाटाळ !
वक्फ कायद्यात सुधारणा झाल्यास वक्फ भूमी सरकारच्या नियंत्रणात जाण्याची भीती
उडुपी (कर्नाटक) – वक्फला भूमी दान करणारे मुसलमान वक्फविषयी होत असलेल्या वादानंतर आता भूमी दान करण्यास टाळाटाळ करत आहेत. दान केलेली भूमी सरकार अपेक्षित कार्यासाठी वापरणार नाही, अशी चिंता ‘मुस्लिम बंधू मंचा’ने व्यक्त केली आहे.
मुस्लिम बंधू मंचाचे अनिस पाशा यांनी सांगितले की, वक्फ कायद्यात सुधारणा करण्यात येत आहे, ज्यामुळे मुसलमान समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुसलमानांनी दान केलेली संपत्ती त्यांच्या नावावर नसते. दान केलेली भूमी वक्फ बोर्डाच्या नावावर असते. दान केल्यानंतर ही संपत्ती सरकारकडे जाईल, अशी भीती लोकांमध्ये आहे.
दान केलेली भूमी उद्दिष्टानुसार वापरण्यात येईल कि नाही ?, याचीही चिंता मुस्लिमांना वाटत आहे. ही मानसिकता सरकारनेच निर्माण केली आहे. त्यामुळे वर्ष २०२४ मध्ये केंद्र सरकार ज्या सुधारणा अमलात आणण्याचा विचार करत आहे, त्या मागे घ्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
संपादकीय भूमिकामुळात वक्फ कायद्यात सुधारणा नाही, तर तो रहित करणेच आवश्यक आहे. वक्फने दान म्हणून मिळावलेल्या भूमींपेक्षा लाटलेल्या भूमीच अधिक असल्याने त्या सरकार जमा होणेच आवश्यक आहे ! |