न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई आणि निष्काळजीपणा खपवून घेणार नाही ! – मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची चेतावणी
मुंबई – न्यायालयीन प्रकरण हाताळतांना दिरंगाई आणि निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी चेतावणी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी विधी विभागातील अधिकार्यांना दिली आहे. विधी खात्यातील अधिकार्यांनी न्यायालयात प्रविष्ट होणार्या महापालिकेच्या संबंधित सर्व न्यायिक प्रकरणांचा नियमितपणे आढावा घ्यावा. कार्यवाहीचे सर्व महत्त्वाचे टप्पे ठरवून त्याविषयी वेळापत्रक निश्चित करावे. विधी अधिकार्यांनी अधिक दक्षतेने आणि दायित्वाने न्यायालयीन कामकाज हाताळावे, असे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.