पुणे विभागामध्ये २४ लाख रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ हस्तगत !
विजयादशमी आणि दीपावली सणांतील धडक मोहीम !
पुणे – विजयादशमी आणि दीपावली या सणांच्या कालावधीत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पुणे विभागामध्ये २४ लाख ७ सहस्र ९१८ रुपयांचा अन्नसाठा हस्तगत केला आहे. यामध्ये दूध, गाईचे तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा आणि वनस्पती आदी अन्नपदार्थांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये ४८, तर अन्न आस्थापनातून ५५ अन्नपदार्थांचे नमुने पडताळणीसाठी घेण्यात आले. त्यातून १४ लाख ८८ सहस्र ३९८ रुपयांचा बनावट साठा हस्तगत केला. पुणे विभागातून ८३ अन्न आस्थापनांची पडताळणी करण्यात आली. १०२ अन्नपदार्थांचे नमुने पडताळणीसाठी घेण्यात आले. त्यातून ९ लाख १९ सहस्र ५२० रुपयांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ हस्तगत करण्यात आले.
संपादकीय भूमिकाजनतेच्या आरोग्याशी खेळणार्यांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांची दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत, असेच सर्वसामान्य जनतेला वाटते ! |