आदिवासी सवलतींचा लाभ घेणार्‍या आयटीआयमधील धर्मांतरित विद्यार्थ्यांवर कारवाई होणार !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – आयटीआयमधील काही विद्यार्थी आदिवासी समाजातून इतर धर्मात धर्मांतरित होऊन आदिवासींसाठीच्या सवलतींचा लाभ घेत आहेत, हे वर्ष २०२३ मधील प्रवेश प्रक्रियेच्या वेळी लक्षात आले होते. या प्रकरणी कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हिवाळी अधिवेशनात सखोल चौकशीचे निर्देश दिले होते. चौकशीसाठी गठीत केलेल्या समितीने अहवालात सांगितले की, अनुसूचित जमातीतील १३ सहस्र ८५८ विद्यार्थ्यांपैकी २५७ विद्यार्थ्यांनी हिंदु धर्माव्यतिरिक्त इतर धर्म नोंदवलेला आहे. या प्रकरणी त्या विद्यार्थ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्याचे कौशल्य विकास विभागाने निश्चित केले असून संबंधित अहवाल पुढील कार्यवाहीसाठी आदिवासी विकास विभागाकडे सुपुर्द करण्यात आला आहे.

आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि चालीरितींचे संवर्धन करण्यासाठी समितीने विविध उपाययोजना सुचवल्या असून त्याही आदिवासी विकास विभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका :

शिक्षणक्षेत्रात अन्य ठिकाणी असे होत नाही ना ? याचीही चौकशी व्हायला हवी !