‘सनातन प्रभात’ नियतकालिकासाठी मराठी लिखाणाचे कन्नडमध्ये भाषांतर करण्याची सेवा करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
‘पूर्वी एकदा आम्हाला प.पू. गुरुदेवांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांनी मला ‘सनातन प्रभात’ नियतकालिकासाठी मराठी लिखाणाचे कन्नड भाषेत भाषांतर करण्याची सेवा शिकून घ्या’, असे सुचवले होते. त्यानंतर भाषांतराची सेवा शिकतांना आलेल्या अडचणींवर मला मात करता आली.
१. सेवा करतांना प.पू. गुरुदेवांचा आशीर्वाद आणि चैतन्य जाणवणे
‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची सुवचने’, हा मराठी भाषेतील ग्रंथ कन्नड भाषेत भाषांतरित करतांना ‘प.पू. गुरुदेव आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले. मी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची सुवचने अत्यंत आदराने वाचली. त्यांचे कन्नडमध्ये भाषांतर करतांना मला त्यांतील चैतन्य जाणवले.
२. शरणागतभाव ठेवून सेवा केल्यावर अडथळे दूर होऊन सेवा पूर्ण होणे
‘भाषांतराची सेवा परिपूर्ण कशी करावी ?’, याविषयीचे विचार ईश्वरच मला देतो. दैवी शक्ती त्यांमध्ये चैतन्य निर्माण करतात. या सेवेत वाईट शक्ती विघ्ने आणतात, तसेच सेवा खंडित करण्याचा प्रयत्न करतात. त्या वेळी मी शरणागतभाव ठेवल्याने सेवा पूर्ण होते.’
– सौ. नंदिनी उल्हास पोकळे, फोंडा, गोवा.
भाषांतराची सेवा करण्यासाठी दोन्ही भाषांचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे !
‘भाषांतर म्हणजे एका भाषेचे दुसर्या भाषेत अर्थ आणि चैतन्य यांसहित परिवर्तन करणे. या सेवेत आपल्याला दोन्ही भाषा व्यवस्थित यायला हव्यात. आपल्याला त्यांचा गोडवा जाणवायला हवा. आपले मन आणि बुद्धी यांना त्या भाषांचा सराव झाला पाहिजे. आपल्याला या दोन्ही भाषांचे बारकावे ज्ञात असले पाहिजेत.’ – सौ. नंदिनी पोकळे
|