आम्ही ब्रिटनमधील लोक अनभिज्ञ आहोत !
प्राचीन भारताने पाश्चिमात्यांच्या प्रगतीला कसा आकार दिला, याविषयी लपवली गेलेली कथा !
गणित, खगोलशास्त्र आणि अन्यही बर्याच विषयांसंदर्भात भारतातून युरोपमध्ये गेलेल्या ज्ञानाची इतिहासकारांनी दखल घेतलेली नाही. मूळ भारतीय ज्ञानाचा पाश्चिमात्य देशांपर्यंत झालेला आणि पुन्हा भारताकडे झालेला प्रवास यांविषयी विलियम डर्लिंपल यांनी लिहिलेला ‘द गार्डियन’ संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेला लेख आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
८ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘ब्रह्मगुप्तांनी ‘शून्या’वर संशोधन करून गणितावर लिहिलेला ग्रंथ, अंकगणितातील नियमांचे आणि गुरुत्वाकर्षाविषयी संशोधन करणारे ब्रह्मगुप्त अन् कोणत्याही भागावर विजय मिळवून नव्हे, तर सांस्कृतिक आकर्षण आणि सुसंस्कृतपणा यांमुळे अन्य देश भारताकडे ओढले गेले’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/852255.html
५. भारतीय इतिहास, संस्कृती, विज्ञान आणि ज्ञान यांना कमी लेखून त्यांचे चुकीचे सादरीकरण केले गेले !
जर भारताचा त्याच्या सभोवती असलेल्या प्रदेशांतील धर्म किंवा संस्कृती यांवर असलेला प्रभाव हा जगाच्या इतिहासामध्ये मध्यवर्ती होता, तर ‘भारताचा इतर प्रदेशांवर चांगला प्रभाव नव्हता आणि विस्तृत प्रमाणात तो ठाऊक नव्हता’, असा विलक्षण प्रसार का केला जात आहे ? वसाहतवादाच्या अजूनही रेंगाळणार्या वारशामुळे विशेषतः व्हिक्टोरियाच्या भारतातील इतिहासाने भारतीय इतिहास, संस्कृती, विज्ञान आणि ज्ञान यांना कमी लेखून त्यांचे चुकीचे सादरीकरण करून त्यांचे अवमूल्यन केले. थॉमस बेबिंग्टन मेकॉले याने आत्मविश्वासाने म्हटले, ‘म्हणे युरोपियन वाचनालयातील एका कपाटातील पुस्तके भारत आणि अरेबिया येथील संपूर्ण साहित्य आहे.’
‘भारत बलवान, विश्वबंधुत्व मानणारा आणि मूळात सुसंस्कृत आहे’, अशी मान्यता भारताला मिळालेली असतांना व्हिक्टोरियाच्या ब्रिटीश सभ्यतेच्या मोहीमला काय अर्थ आहे ? अशा परिस्थितीत ख्रिस्ती धर्मापूर्वी जगाचा एक भाग असलेल्या सहस्रो वर्षे सर्वाेच्च सभ्यता असलेल्या आणि संपूर्ण आशियामध्ये आपला प्रभाव असलेल्या भागात तुम्ही आपली (ब्रिटीश) संस्कृती कशी स्थापन करू शकता ? यातील विडंबनाचा भाग म्हणजे भारतात असलेल्या वेगवेगळ्या नवीन संकल्पनांमुळे पश्चिमी राष्ट्रे भारताला जिंकण्यासाठी पूर्वेकडे वळली.
६. भारतातील ‘संख्या’ अरब देशांत कशा पोचल्या ?
भारतामध्ये शोधून काढण्यात आलेल्या ‘संख्या’ ८ व्या शतकामध्ये अरब देशांनी स्वीकारल्या. याविषयी बगदाद येथील विझीअर्स (ज्येष्ठ अधिकारी) राजवंशाला धन्यवाद दिले पाहिजेत. बौद्ध धर्मातून ‘बर्माकिड्स’मध्ये धर्मांतरित झालेले काही जण संस्कृत शिकलेले होते. यापैकी काही जणांनी काश्मीरमध्ये भारतीय गणिताचा अभ्यास केला होता. या ‘बर्माकिड्स’नी भारतीय वैज्ञानिक पुस्तकांच्या शोधार्थ आपले शिष्टमंडळ भारतात पाठवले. याचा परिणाम म्हणजे ब्रह्मगुप्त आणि आर्यभट्ट यांनी संग्रह केलेले ग्रंथातील ज्ञान इसवी सन ७७३ या वर्षी बगदाद येथील ग्रंथालयात आणले गेले. त्यानंतर एक पिढी झाल्यानंतर बगदादच्या ग्रंथालयात संस्कृत भाषेतून असलेल्या गणिताच्या पुस्तकांचे ‘ख्वारिझ्मी’ (ज्याचे नाव ‘अल्गोरिदम’ या शब्दाचे मूळ आहे.) या पर्शियन विद्वानाने उत्कृष्टपणे सारांश काढला. या विद्वानाने लिहिलेले ‘किताब अल जब्र’ हे पुस्तक ‘आल्जेब्रा’ या शब्दाचा पाया आहे. हे पुस्तक अरब जगतामध्ये गणिताचा पाया झाले; परंतु या पुस्तकात त्याला प्रेरणा देणार्या पुस्तकाचा उल्लेख आहे. हे पुस्तक हिंदु गणना पद्धतीनुसार गणना करणारे पूर्ण आणि संतुलित असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हे पुस्तक अरब जगतामध्ये गणित या विषयातील पायाभूत पुस्तक ठरले.
बगदादमधून या संकल्पना इस्लामी देशांमध्ये पसरल्या. त्यानंतर ५०० वर्षांनी म्हणजे वर्ष १२०२ मध्ये ‘फिबोनस्सी’ हे टोपणनाव असलेला लिओनार्दाे बिसा त्याच्या वडिलांसह आल्जेरियाहून इटली येथे आला, तेव्हा त्याला ‘त्याचे सहबांधव लॅटीन अंकपद्धतीत अडकलेले आहेत’, असे दिसले. फिबोनस्सी हा बेजाय येथील पिसान या व्यापारी केंद्रावर होता. या ठिकाणी असतांना त्याने अस्खलित अरब भाषा आणि अरब गणिताचा अभ्यास केला. तेथून परत आल्यावर वयाच्या ३२ व्या वर्षी त्याने गणनेवर आधारित ‘लिबर अबासी’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये त्याने म्हटले, ‘‘भारतातील ९ अंक वापरून सिद्ध केलेल्या अगदी अद्भुत अशा शिकवणीशी माझा परिचय झाला. अरबमध्ये झेफेर (अल सिफ्र) म्हणतात, त्या शून्य या अंकाच्या साहाय्याने कुठलीही संख्या लिहिता येते, हे कळल्यानंतर मला पुष्कळ आनंद झाला. त्यामुळे लॅटीन लोकांना गणितातील ज्ञानाचा अभाव होऊ नये, यासाठी मी हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला.’’
७. गणिती ज्ञानाविषयीच्या अरबी पुस्तकाला युरोपात प्रसिद्धी आणि त्या आधारे तेथील बँकींग व्यवहारात झालेली क्रांती
फिबोनस्सी यांच्या ‘लिबर अबासी’ या पुस्तकाने यांनी अरबी अंक समजल्या जाणार्या अंकांना युरोपमध्ये प्रसिद्धी दिली. यामुळे आरंभी ‘मेडसी’ या राजवंशाच्या सत्तेच्या वेळी इटलीमध्ये आणि नंतर उर्वरित युरोपमध्ये बँकींग अन् लेखा यांची बीजे रोवली गेली. या नवीन गोष्टींमुळे तिथे व्यापार आणि बँकांच्या व्यवहारांमध्ये क्रांती झाली, ज्यामुळे पुर्नजागरणासाठी वेळेत निधी उपलब्ध झाला. जसजसा या संकल्पनांचा उदय युरोपमध्ये झाला, तसतसे शेवटी त्यांना पूर्वेकडे म्हणजे या सर्व संकल्पनांचा मूळ स्रोत असलेल्या भारताकडे पहावे लागले; परंतु युरोपियनांचे वादातीत असलेले व्यापारातील कौशल्य आणि पुढाकार यांमुळे युरोप भारताच्या वरचढ ठरला.
१८ व्या शतकाच्या मध्यापासून लंडनमधून व्यापारी आणि लेखापाल यांनी वह्या तयार करून काळजीपूर्वक केलेल्या लेखाच्या कामानुसार चालवल्या जाणार्या ईस्ट इंडिया कंपनी या युरोपियन महामंडळाने त्या वेळच्या खंडित अन् विभाजित झालेल्या भारतावर नियंत्रण मिळवले. कदाचित् इतिहासातील व्यावसायिक जगतातील हा सर्वाेच्च प्रमाणातील हिंसाचार असावा.
लेखाच्या संदर्भात ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावर ‘सनातन प्रभात’कडून देण्यात आलेला अभिप्राय !
प्राचीन भारताने कशा प्रकारे पाश्चिमात्यांच्या प्रगतीला आकार दिला, याविषयी आश्चर्याचे, म्हणजे ‘आम्ही ब्रिटनमध्ये अज्ञानी आहोत’, हा मथळा असलेला पुष्कळ चांगला लेख (एरव्ही हिंदूविरोधी लिखाण करणार्या) ‘द गार्डियन’ या वृत्तसंस्थेने प्रकाशित केला आहे. आश्चर्य म्हणजे त्यांनी भारताच्या गणित विषयातील पराक्रमाला हिंदुविरोधी छुप्या हेतूचे प्रमाण शून्य ठेवून श्रेय दिले आहे. याचे लेखक विलियम डर्लिंपल हे अन्य वेळा भारतातील साम्यवादी विचारसरणीच्या इतिहासकारांचे आवडते लेखक आहेत. त्यामुळे त्यांचे या लेखासाठी अभिनंदन केले पाहिजे. विलियम यांच्या लेखात जे मांडले आहे, ते दर्शनी स्वरूपात आपण वाचले, तर त्यावरून आमच्यासमोर ५ महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे ‘द गार्डियन’ आणि विलियम यांनी द्यावीत.
१. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये गेल्या ३ शतकांमध्ये भारताविरुद्ध अपप्रचार करण्यात आला, हे तुम्ही खुल्या मनाने मान्य कराल का ?
२. ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटीश आणि समकालीन तथाकथित भारतीय विद्येचे अभ्यासक यांनी केलेल्या चुका तुम्ही सुधारणार आहात का ?
३. हिंदु संस्कृती ही एकच संस्कृती सहस्रो वर्षांपासून टिकून आहे, या वस्तूस्थितीला तुम्ही मान्यता देऊन त्याचा प्रचार करणार का ?
‘In Britain, we are still astonishingly ignorant’: the hidden story of how ancient India shaped the west’
A beautifully crafted article by #Guardian, a typically Hinduphobic news outlet otherwise.
“Astonishingly”, it has given the credit to India for its genuine mathematical… pic.twitter.com/bSluJBiUDU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 2, 2024
४. ‘हिंदु’ म्हणून आम्ही आमच्या खर्या शिकवणींना उजाळा देऊन आमच्या वैभवशाली भूतकाळातील शिकवणींचा अभ्यास करून आमचे जीवन पुनरुज्जीवित करत आहोत. त्यामुळे लेखक कोणताही निहित हेतू न ठेवता खुल्या मनाने या वैभवशाली शिकवणीला मान्यता देऊन तिचा प्रसार करणार आहे का ?
५. यापुढे एक पाऊल जाऊन भारताच्या वतीने आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, जरी आमच्या मृदूसत्तेने प्राचीन आणि मध्ययुगातील जगावर राज्य केले असले, तरी आधुनिक भविष्यकाळात भारत ही सर्वांत उल्लेखनीय बळकट सत्ता (हार्ड पॉवर), म्हणजे सैन्य आणि अर्थव्यवस्था यांच्या बळावरील सत्ता होईल. मध्ययुगातील बळाच्या आधारावरील सत्तेमुळे हिंदूंना मोकळा श्वास घेण्यास साहाय्य झाले; परंतु इतर सभ्यता किंवा संस्कृती किंवा लेखकाने उल्लेख केलेली ग्रीक संस्कृती यांनी शेकडो वर्षांपूर्वी शेवटचा श्वास घेतला, याविषयी वेगळा लेख लिहून ‘गार्डियन’ ही वृत्तसंस्था खरोखर मनाचा मोठेपणा दाखवणार आहे का ?
८. गणित आणि वैज्ञानिक कौशल्ये यांचे केंद्र म्हणून भारताची प्रतिष्ठा आजही अबाधित !
आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाल्यानंतर पुन्हा एकदा भारताची वेळ आता आली आहे, असे अनेकांना वाटते. सध्याच्या एका पिढीमध्ये भारताची अर्थव्यवस्था चौपट झाली आहे. गणित आणि वैज्ञानिक कौशल्ये यांचे केंद्र म्हणून भारताची प्रतिष्ठा अबाधित राहिली आहे; कारण सध्या भारतातील सॉफ्टवेअर अभियंते सिलीकॉन व्हॅलीमधील ज्ञानविषयक आस्थापनांमध्ये कर्मचारी म्हणून रूजू होण्याचे प्रमाण वाढत आहे. आता या शतकाच्या शेवटी भारत, चीन कि अमेरिका जगावर वर्चस्व प्रस्थापित करील आणि त्या वेळी भारत कशा प्रकारचा असेल ? हा एक प्रश्न आहे.
सहस्रो वर्षांसाठी भारतातील संकल्पना पसरल्या आणि त्यांनी जगामध्ये पालट घडवून आणला, हे ‘गोल्डन रोड’द्वारे (प्राचीन भारताने जगामध्ये कसा पालट घडवून आणला, याविषयी ‘ब्लूम्सबरी’ प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले विलियम डार्लींपल यांनी लिहिलेले ‘गोल्डन रोड’ हे पुस्तक) उद्धृत करण्यात आले आहे. सर्व जगाभोवती राजकीय सीमांवर केवळ भारतातील संकल्पनांच्या क्षमतेवर भारतीय संस्कृतीचे वलय निर्माण झाले आहे. या क्षेत्रामध्ये भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांनी ज्याला स्पर्श केला, त्यामध्ये पालट झाला आहे. यामुळे वर्ष १९४७ मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत पुन्हा एकदा तसा पालट करू शकतो का ? असा प्रश्न उपस्थित होतो.
(समाप्त)
(साभार : ‘द गार्डियन’चे संकेतस्थळ)
संपादकीय भूमिकाआधुनिक भविष्यकाळात भारत ही सर्वांत उल्लेखनीय बळकट सत्ता म्हणजे सैन्य आणि अर्थव्यवस्था यांच्या बळावरील सत्ता होईल ! |