अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमधील पुनरागमनाचा भारतावर होणारा परिणाम !
डॉनल्ड ट्रम्प यांचा विजय भारताच्या हितसंबंधांसाठी आशावादी !
डॉनल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमधील पुनरागमनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील विजयाच्या भाषणानंतर लगेचच ‘माझे मित्र’ म्हणून ट्रम्प यांचे अभिनंदन करणार्या जागतिक नेत्यांपैकी मोदी हे पहिले जागतिक नेते होते. ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील त्यांच्या लिखाणामध्ये वर्ष २०२० मध्ये झालेल्या ट्रम्प यांच्या भारत दौर्यासह त्यांच्याशी भूतकाळातील परस्पर संवाद दर्शवणारी छायाचित्रे होती.
१. भारत-अमेरिका संबंधांसाठी आशावाद
माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रिंगला, ज्यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेचे राजदूत म्हणून काम केले होते, त्यांनी ट्रम्प यांच्या पुनरागमनाविषयी आशावाद व्यक्त केला. ‘भारतासाठी ही चांगली बातमी आहे’, असे ते मानतात. ‘ट्रम्प यांनी जिथे सोडले होते, तेथून ते पुन्हा चालू करतील’, असे ते सुचवत आहेत. श्रिंगला यांनी मोदी सरकारच्या ट्रम्प यांच्यासमवतेच्या पूर्वीच्या सहकार्याची नोंद घेतली आणि त्यांच्या परस्पर संबंधांवर प्रकाश टाकला. गाझा पट्टी आणि युक्रेन येथे शांतता प्रस्थापित करण्याची ट्रम्प यांची बांधिलकी ‘ही युद्धाची वेळ नाही, या मोदी यांच्या भूमिकेशी सुसंगत आहे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
२. सामायिक उद्दिष्टे आणि धोरणात्मक उपक्रम
ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात भारत आणि अमेरिका यांनी अनेक महत्त्वाच्या सूत्रांवर, विशेषतः आतंकवादविरोधी अन् ‘इंडो-पॅसिफिक’ प्रदेशातील (हिंदी महासागराभोवतीची राष्ट्रे आणि पॅसिफिक प्रदेश) चिनी आक्रमकतेला संबोधित करण्यासाठी समान भूमिका घेतली. याच काळात ‘क्वाड’ संघटनेला (‘क्वाड’ म्हणजे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या ४ देशांचा गट) महत्त्वपूर्ण स्तरावर बढती देण्यात आली आणि काही प्रमुख लष्करी करारांवर स्वाक्षर्या करण्यात आल्या. याखेरीज ‘इंडो-पॅसिफिक’ या शब्दाला भूराजकीय महत्त्व प्राप्त झाले आणि त्यामुळे चीनच्या विस्तारवादी धोरणांचा धोरणात्मक प्रतिकार झाला.
३. राजकीय हितसंबंध मार्गी लागणे
ट्रम्प यांच्या विजयामुळे भारतीय अधिकार्यांसाठी राजनैतिक संवादही सोपे होऊ शकतात. ट्रम्प आणि मोदी यांच्यातील प्रस्थापित संबंध द्विपक्षीय समस्या सोडवण्यासाठी अन् परस्पर हितसंबंध पुढे नेण्यासाठी एक सुगम मार्ग प्रदान करू शकतात.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)
अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डॉनल्ड ट्रम्प यांच्या जोरदार पुनरागमनामुळे विविध क्षेत्रांमध्ये तीव्र भावनिक प्रतिसाद निर्माण झाला आहे. मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांसाठी हे धोक्याच्या वृत्ताकडे परतण्याचे संकेत देते. डेमोक्रॅटिक पक्षासाठी हा मनन करण्याचा क्षण आहे; कारण त्यांची राजकीय ओळख प्रतिध्वनित करण्यात ते अयशस्वी ठरले आहेत. याच काळात उजव्या विचारसरणीच्या भारतीय प्रसारमाध्यमांनी उत्साहाने प्रतिक्रिया दिली असून एक भारतीय म्हणून नातेसंबंधांची भावना व्हाईट हाऊसकडे जात असल्याचे सूचित केले आहे. तथापि ट्रम्प यांच्या पुनरागमनाचे व्यापक परिणाम समजून घेण्यासाठी भावनिक प्रतिक्रियांच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे.
१. अमेरिकन ‘डीप स्टेट’ आणि राजकीय पुनर्रचना
ट्रम्प यांची पुन्हा झालेली निवड अमेरिकन ‘डीप स्टेट’चे दृढीकरण करण्यास गती देऊ शकते, ज्यामध्ये शीतयुद्धानंतर अमेरिकेचे जागतिक वर्चस्व टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने कायमस्वरूपी कार्यकारी, राजकीय सहयोगी आणि ‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) समर्थकांचा समावेश आहे. या एकत्रिकरणामुळे ट्रम्प यांच्याकडे चीनसारख्या बाह्य धोक्यांपेक्षा किंवा बहुपक्षीयतेपेक्षा त्यांच्या ‘अजेंड्या’साठी (विषयपत्रिकेसाठी) मोठा अडथळा म्हणून पाहिले जाण्याची शक्यता आहे. परिणामी युक्रेन आणि गाझा पट्टी येथे चालू असलेले संघर्ष बहुपक्षीय प्रयत्नांद्वारे निराकरण होण्यापर्यंत पोचू शकतात किंवा नेहमीप्रमाणे व्यावसायिकदृष्टीने त्यांना बाजूला केले जाऊ शकते. या राजकीय परिस्थितीमुळे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन यांच्यातील वैचारिक रेषा धुसर होऊन एक पुनर्रचना होईल. अलीकडील मोहिमेने हा कल दर्शवला आहे. तुलसी गबार्डसारख्या व्यक्तींनी डेमोक्रॅटिक निकषांना आव्हान दिले आणि रिपब्लिकन लिझ चेनी यांनी डेमोक्रॅटिक उमेदवारांचे समर्थन केले. जसजशी राजकीय विचारधारा अस्पष्ट होत जाते, तसतसे पक्षाचे सदस्य आणि मतदार यांच्यामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. वर्ष २००० च्या दशकाच्या प्रारंभीच्या काळातील भारताच्या राजकीय परिस्थितीची आठवण करून देणारी परिस्थिती प्रतिबिंबित होते. त्या परिस्थितीत आपला मार्ग पुन्हा कळण्यासाठी महत्त्वपूर्ण नेतृत्वाची आवश्यकता होती.
२. व्यापार गतीशीलता आणि आर्थिक परिणाम
ट्रम्प यांच्यासाठी व्यापार संतुलित करण्यावर आणि तूट न्यून करण्यावर लक्ष केंद्रित करणे सर्वांत चांगले ठरील. त्यांच्या पहिल्या कार्यकाळापासून चीन, भारत आणि युरोप यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये अमेरिकन तेल अन् वायू निर्यातीत वाढ होण्याची आपण अपेक्षा करू शकतो. त्यांच्या आधीच्या प्रशासनाच्या वेळी आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मितीला हातभार लावलेल्या या धोरणांमुळे भारतासाठी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. ट्रम्प देशांतर्गत हितसंबंधांना प्राधान्य देत असल्याने नोकर्या गमावल्या जाऊ शकतात आणि ‘व्हिसा’विषयी विवाद होऊ शकतात.
३. परराष्ट्र व्यवहार : एक नवीन राजनैतिक दृष्टी
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवर भर दिल्यामुळे चीन आणि भारत यांच्याशी राजनैतिक वाटाघाटी आवश्यक ठरतील, ज्यामुळे त्यांना किमान अमेरिकन हस्तक्षेपासह त्यांची जागतिक स्थिती मजबूत करण्यासाठी अवधी मिळेल. जरी ट्रम्प देशांतर्गत नागरिकांची सेवा करत असतांना काही तणाव कायम राहू शकतो, तरी लक्षणीय पालट उद्भवू शकतात. उदाहरणार्थ ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात थांबवण्यात आली होती ती इराणकडून तेलाची आयात भारताने पुन्हा चालू केली, तर ते बहुध्रुवीय जागतिक वास्तवाकडे वळण्याचे संकेत देतील. या व्यतिरिक्त भारताच्या ‘तेजस’ या लढाऊ विमानासाठी अमेरिकन ‘जेट इंजिन’ पुरवठ्याची स्थिती द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचक म्हणून काम करील.
४. चालू असलेल्या संघर्षांमध्ये संभाव्य पालट
ट्रम्प प्रशासन युक्रेन आणि गाझा पट्टी येथे चालू असलेल्या युद्धांसाठी एक नवीन दृष्टीकोन आणण्याची शक्यता आहे. हे संघर्ष एकतर बहुपक्षीय करारांद्वारे संपुष्टात येऊ शकतात किंवा सामान्य स्थिती पूर्ववत् करण्यासाठी त्यांना कमी महत्त्व दिले जाऊ शकते. साथीच्या रोगानंतर, अमेरिकेला ‘प्रॉक्सी वॉर’ (छुपे युद्ध) आणि आर्थिक आव्हाने यांचा सामना करावा लागला आहे. अशा प्रकारे अमेरिका आणि जागतिक समुदाय या दोघांसाठीही स्थिरता प्रस्थापित करण्याकडे परत येणे आवश्यक आहे.
५. भारतासाठी धोरणात्मक लाभ आणि व्यावसायिक आव्हाने
ट्रम्प यांचा विजय भारतासाठी धोरणात्मक लाभ दर्शवत असला, तरी तो लक्षणीय व्यावसायिक आव्हाने निर्माण करू शकतो. हे पहाता भारताच्या परराष्ट्र कार्यालयासाठी एक महत्त्वपूर्ण विचार आहे; कारण भारत-अमेरिकन संबंधांमध्ये एक नवीन अध्याय चालू होईल आणि अमेरिका परस्परविरोधी गतीशीलतेमध्ये समेट करण्याचा प्रयत्न करील.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (६.११.२०२४)