Sheikh Hasina Congratulates Donald Trump : बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी स्वतःचा ‘पंतप्रधान’ असा उल्लेख करत ट्रम्प यांना दिल्या शुभेच्छा !
बांगलादेशातील जनतेत चर्चा !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील अवामी लीगच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याविषयी डॉनल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. या वेळी शेख हसीना यांनी स्वतःचा उल्लेख ‘बांगलादेशाच्या पंतप्रधान’ असा केला आहे. या वेळी त्यांनी दोन्ही देशांचे द्विपक्षीय आणि बहुपक्षीय हितसंबंध पुढे नेण्यासाठी एकत्र काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. या शुभेच्छानंतर बांगलादेशात चर्चा चालू झाली आहे.
ट्रम्प यांना पाठवलेल्या अभिनंदन संदेशात शेख हसीना यांनी स्वतःला ‘पंतप्रधान’ म्हणून संबोधल्याविषयी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला प्रश्न विचारण्यात आला होता. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, भारत शेख हसीना यांना माजी पंतप्रधान मानतो. शेख हसीना या माजी पंतप्रधान आहेत, असे आम्ही वारंवार सांगितले आहे. याविषयी आमची हीच भूमिका आहे.