India Deserves In SUPERPOWERS : जागतिक महासत्तांच्या सूचीमध्ये भारताचा समावेश व्हायला हवा ! – व्लादिमिर पुतिन
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे विधान
मॉस्को (रशिया) : आम्ही विविध क्षेत्रात भारताशी आमचे संबंध विकसित करत आहोत. भारत हा एक महान देश आहे. आर्थिक वाढीच्या संदर्भातही मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये तो प्रमुख आहे. त्याचा विकासदर ७.४ टक्के इतका आहे. रशिया आणि भारत यांच्यातील सहकार्य प्रतिवर्षी वाढत आहे. जागतिक महासत्तांच्या सूचीमध्ये भारताचा समावेश व्हायला हवा, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी भारताचे कौतुक केले. ते रशियातील सोची येथील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.
पुतिन पुढे म्हणाले की,
१. भारत १ अब्ज ४० कोटी लोकसंख्या असलेला देश आहे आणि जगातील सर्वांत वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्याची संस्कृती खूप प्राचीन आहे आणि भविष्यात तिच्या विकासाच्या अफाट शक्यता आहेत.
२. भारत आणि रशिया संरक्षण क्षेत्रातही सहकार्य वाढवत आहेत. भारतीय सैन्याकडे रशियाची अनेक शस्त्रे आहेत. यावरून दोन्ही देशांमधील विश्वास दिसून येतो. आम्ही आमची शस्त्रे केवळ भारताला विकतोच असे नाही, तर अनेक शस्त्रांची रचनाही एकत्र करतो.